मुंबई

शिवडी टीबी रुग्णालय बालरोगतज्ज्ञच्या शोधात

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात तीन ते बारा वर्षे वयोगटातील मुलांसाठी लहान मुलांचा विभाग (पीडियाट्रिक वॉर्ड) तयार करण्यात आला आहे; मात्र बालरोगतज्ज्ञ (पिडियाट्रिशन) उपलब्ध होत नसल्याने हा वॉर्ड अद्याप सुरू झालेला नाही. चांगल्या दर्जाचे पिडियाट्रिशन आणि इतर चांगले डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी शिवडी टीबी रुग्णालयातर्फे वेगवेगळ्या विविध शक्कल सुचवल्या जात आहेत.
मुंबईबाहेरील नामवंत डॉक्टरांना ज्यांना मुंबईत स्थायिक व्हायचे आहे, त्यांना यापुढे पालिकेतर्फे निमंत्रित केले जाणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला जाणार आहे. याबाबतीत पालिका प्रशासनाशी बैठक झाली असून अजून यावर विचारविनिमय सुरू असल्याचे शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या वरिष्ठांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांपासून यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वारंवार जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतरही या जाहिरातीला एकाही पिडियाट्रिशनने प्रतिसाद न दिल्याची खंत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आता मुंबई किंवा मुंबईबाहेरून डॉक्टर मिळवण्यासाठी विविध कल्पनांचा वापर करण्यात येत आहे.
वसतिगृहाची सुविधा
३ ते १२ या वयोगटातील मुलांच्या उपचारांसाठीच्या वॉर्डचे जागतिक क्षयरोगाच्या दिनानिमित्त उद्‍घाटन करण्याची पालिकेची तयारी होती, पण लहान मुलांसाठी लागणारे बालरोगतज्ज्ञच अजूनपर्यंत पालिकेला उपलब्ध झाले नसल्याने फक्त मोठ्या मुलांवर उपचार केले जातात. डॉक्टरांना पालिकेच्या निवासी वसतिगृहात राहण्यासाठी जागा देण्याची कल्पना सुचवण्यात आली आहे. यासंदर्भात प्रस्ताव काढून आयुक्तांची मान्यता घेण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. इतर काही पर्याय या डॉक्टरांसाठी उपलब्ध करून देता येतील का, याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT