मुंबई

स्वराज्य भूमी उजळणार

CD

स्वराज्य भूमी उजळणार
मरीन थीमवर आधारित भित्तीचित्रांसह आकर्षक विद्युतरोषणाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः लोकमान्य टिळक यांचे स्मृतिस्थळ असणाऱ्या स्वराज्य भूमीचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. या भागात मरीन थीमवर आधारित भित्तीचित्रांसह आकर्षक विद्युतरोषणाई केली जाणार आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनाअगोदर हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गिरगाव चौपाटीच्या बाहेर लोकमान्य टिळकांचे स्मृतिस्थळ आहे. या स्मृतिस्थळाला स्वराज्य भूमी नावाने ओळखले जाते. गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांपैकी अनेक पर्यटक येथे येऊन लोकमान्यांच्या स्मृतिस्‍थळाला भेट देऊन अभिवादन करतात. सध्या मुंबईत सुरू असलेल्या सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत स्वराज्यभूमीचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
संपूर्ण स्वराज्य भूमीच्या भोवती भित्तीचित्रे उभी केली जाणार आहेत.

समुद्रा सफर कोरणार
स्वराज्यभूमी ही समुद्र किनारी असणाऱ्या या भित्तीचित्रांवर समुद्री दुनियेची सफर कोरली जाणार आहे. यामुळे एक वेगळाच देखावा पर्यटकांना अनुभवता येणार आहे. याशिवाय लोकमान्य टिळकांच्या जीवनाचा आढावा घेणारी माहितीदेखील यावर दिली जाणार आहे. स्वराज्यभूमी आकर्षक विद्युतरोषणाईने न्हाऊन निघणार आहे. स्वराज्य भूमीमध्ये हेरिटेज लूक देणारे विद्युत दिवेदेखील बसवले जाणार आहेत. संपूर्ण परिसराला आकर्षक विद्युतरोषणाईदेखील केली जाणार आहे. यामुळे संपूर्ण परिसर विद्युतरोषणाईने न्हाऊन निघणार आहे. यासाठी पालिकेने ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. लोकमान्य टिळकांचा स्मृतिदिन हा १ ऑगस्ट रोजी असतो. त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Controversy : चाकणकरांनी अमावस्येला बोट कापून घेतलं ? सुषमा अंधारेंनी फोटो दाखवत केला काळ्या जादूचा आरोप

Nainital Travel: उन्हाळ्यात गुलाबी सरप्राइज हवंय? जापनीज चेरी ब्लॉसमचा नैनीतालमध्ये 'मॅजिक' शो ; नक्की भेट द्या

Project Manager Arrest : थेट CMO कार्यालयातून फरफटत नेलं! 2 लाखांची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजर रंगेहाथ पकडला; पहा थरारक व्हिडिओ

स्टार प्रवाहच्या 'या' अभिनेत्याला रितेशनं केला स्वत:हून फोन, आनंद व्यक्त करत म्हणाला...'रितेश सरांचा स्वत:हून फोन आला आणि...'

फिट्स नेमके मेंदूच्या कोणत्या भागातून सुरू होतात? ‘व्हिडिओ-ईईजी’च्या माध्यमातून शोधणार; केईएममध्ये २५ वर्षांत ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT