मुंबई

पायाभूत साक्षरता, संख्याज्ञानावर शिखर परिषद

CD

मुंबई, ता. १६ : राज्यात शालेय शिक्षण, त्यातील पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (एफएलएन) या विषयावर १९ ते २२ जून या कालावधीत पुणे येथे जी-२० ही शिखर परिषद होणार आहे. यासाठी विविध राज्यांचे शिक्षण सचिव, प्रकल्प संचालक आदी शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांची राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा १७ ते १८ जून रोजी पुणे विद्यापीठात होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली. शिखर परिषदेच्या निमित्ताने सर्व विभागीय उपसंचालक स्तरावर २० जून रोजी रन ऑफ एज्युकेशनचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील शिक्षकांच्या बदल्या यापुढे होणार नाहीत, असे धोरण आणले जाणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.

-----
रन ऑफ एज्युकेशन रॅली
राज्यातील सर्व उपसंचालक विभागामध्ये २० जून रोजी रन ऑफ एज्युकेशन ही रॅली काढली जाणार आहे. त्यात प्रत्येक विभागामध्ये ५०० विद्यार्थी सहभागी होतील. या माध्यमातून पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान याविषयी जनजागृती केली जाईल. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या विषयावर विद्यार्थी संदेश देतील, विद्यार्थी जी-२० चा लागो परिधान करून या रन ऑफ एज्युकेशनमध्ये सहभागी होतील. विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी ही रॅली महत्त्वाची ठरणार आहे.


-----------------
दोन दिवसात संचमान्यता पूर्ण
राज्यातील शाळांमध्ये ३० हजार शिक्षकांची लवकरच भरती केली जाणार आहे. राज्यातील शाळांमध्ये ९० टक्के आधार कार्डचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे. या व्हेरिफिकेशनमध्ये २५ हजार मुलांची संख्या कमी झाली आहे. काहींपैकी १० टक्के विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची खात्री आम्ही करून घेत आहोत; मात्र सर्व १०० टक्के विद्यार्थ्यांच्या आधारचे व्हेरिफिकेशन आणि पुढील दोन दिवसांत संचमान्यता पूर्ण केली जाईल, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली. संच मान्यता सुरू झाल्यानंतर सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांची भरती होईल. त्यासाठीच्या नेमणुका सीईओ करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan: शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी! कृषिमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितली तारीख; कर्जमाफीचा निर्णय कधी?

Jalgaon Gold Market : सोने-चांदीच्या भावात मोठी पडझड! चांदी तब्बल २४ हजारांनी स्वस्त, जळगावच्या बाजारपेठेत खळबळ

Gorai Bus Depot Python : मुंबईकरांनो सांभाळून! गोराई बस डेपोत शिरले दोन महाकाय अजगर; पाहा रेस्क्यूचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Petrol Diesel Price Maharashtra : अमेरिका-इस्त्रायल, इराण युद्धाचा परिणाम; महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल -डिझेलचे दर घ्या जाणून

Maharashtra RTO Recruitment : सरकारी नोकरीची मोठी संधी ! राज्य परिवहन विभागात होणार तब्बल 'इतक्या' जागांवर मेगा भरती

SCROLL FOR NEXT