मुंबई

Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकच्या उपचारांसाठी रेडी स्ट्रोक युनिट

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : पंजाब, कर्नाटक, हरियानानंतर आता महाराष्ट्रातही स्ट्रोक रेडी युनिट सुरू होणार आहेत. प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरुवातीला हे युनिट पाच जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत याची सुरुवात केली जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने त्या दिशेने पावले उचलली आहेत. याअंतर्गत आरोग्य विभागाने सोमवारी एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेशी आरोग्य कर्मचाऱ्यांना स्ट्रोकबाबत प्रशिक्षण दिले आहे. या स्ट्रोक रेडी युनिटमध्ये येणाऱ्या रुग्णांना सीटी स्कॅनपासून ते स्ट्रोकच्या उपचारासाठी दिले जाणारे ३० हजार रुपयांचे महागडे इंजेक्शनही मोफत दिले जाणार आहे.

ब्रेन स्ट्रोकचे वाढते प्रमाण

देशभरात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढत आहे. याअंतर्गत राज्यांमध्ये स्ट्रोक रेडी युनिट सुरू करण्यात येत आहेत. यापूर्वी वयाच्या ५० वर्षांनंतर ब्रेन स्ट्रोकचा धोका होता. आता वयाच्या ३५ व्या वर्षीही ब्रेन स्ट्रोकचे रुग्ण आढळत आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढला आहे. गोल्डन अवरमध्ये उपचार केल्यास रुग्णांचे प्राण वाचू शकतात. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने या दिशेने पाऊल उचलले आहे.

या जिल्ह्यांत सुरू होणार
सर्वप्रथम ठाणे, औरंगाबाद, पुणे, नांदेड आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये स्ट्रोक शोधणे आणि व्यवस्थापनावर पथदर्शी प्रकल्प सुरू करत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी दिली. याअंतर्गत स्ट्रोक रेडी युनिट सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला प्रतिसाद मिळाल्यानंतर इतर जिल्ह्यांमध्येही त्याचा विस्तार करण्यात येणार आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
स्ट्रोक रेडी युनिट स्थापन करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी एंजल्स इनिशिएटिव्ह आणि फार्मा कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत पाच जिल्ह्यांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना स्ट्रोक ओळखून गोल्डन आवरमध्ये उपचार देण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: पेट्रोल-डिझेलनंतर LPG दर वाढणार का? देशात इंधनाचा किती साठा शिल्लक? सरकारने संपूर्ण आकडाच सांगितला

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला, लांबी थेट 856 किमी! आता तुमच्या जिल्ह्यातून जाणार का? पाहा नवीन नकाशानुसार यादी

Kalyan: क्रूरतेची सीमा गाठली! भटक्या कुत्र्यांना मारून नाल्यात फेकलं, केडीएमसीच्या कंत्राटदाराचं कृत्य

Latest Marathi News Live Update : हत्तींच्या मारामारीमध्ये महिलेचा मृत्यू

महाराष्ट्र सोडण्याच्या विचारात आहेत नाना पाटेकर? भर सभेत मंत्र्यांसमोर केलं विधान, म्हणाले, 'खेड्यातली माणसं...'

SCROLL FOR NEXT