Mumbai sakal
मुंबई

Mumbai : सेंट जॉर्ज रुग्णालयात लवकरच डोळ्यांची ओपीडीप्लास्टिक सर्जरी विभागही सुरू होणार

'त्यामुळे' आता हे रुग्णालय पूर्ण ताकदीनिशी सुरू करण्यासाठी जे जे समूह रुग्णालयाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai - मुंबईतील राज्य शासनाच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात कोविडनंतर काही विभाग सुरू झालेच नाहीत. त्यामुळे रुग्णांना सेवा मिळणे अवघड झाले; मात्र आता टप्प्याटप्प्यात एकेक विभाग सुरू करण्यात येत आहे.

सध्या बंद असलेली डोळ्यांची ओपीडी आणि प्लास्टिक सर्जरीचा विभागदेखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
कोविड काळात सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व विभाग बंद करण्यात आले.

तसेच सुरू असलेले विभाग फक्त कोविड रुग्णांसाठी सुरू होते. त्यानंतर कोविडचे प्रमाण कमी झाल्यानंतरही या रुग्णालयावरचा कोविडचा शिक्का पुसला गेला नाही. त्यामुळे, हे सर्व विभाग आजतागायत बंद आहेत.

त्यामुळे, आता हे रुग्णालय पूर्ण ताकदीनिशी सुरू करण्यासाठी जे जे समूह रुग्णालयाचे  प्रयत्न सुरू झाले आहेत. सेंट जॉर्जेस रुग्णालयाचेदेखील यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. येत्या दहा दिवसात रुग्णालयातील नेत्र विभाग आणि प्लास्टिक सर्जरी विभाग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी डॉक्टरांची टीम सज्ज होणार आहे.

डोळ्यांच्या विभागासाठी एक असोसिएट प्रोफेसर आणि एक निवासी डॉक्टर तर प्लास्टिक सर्जरी साठी एक निवासी डॉक्टर अशी टीम असणार आहे. त्यासोबत ओपीडी आणि ओटी साठी पाच तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
- डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Dapoli Crime : जालगाव येथे जन्मदात्या आई-वडिलांवर मुलाचा कुऱ्हाडीने हल्ला; वडिलांच्या डोक्यावर व हातावर घाव

Pune News : महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख; प्रमाणपत्रासाठी १.०५ लाख अर्ज, यवतमाळ सर्वाधिक; पुण्यात ३,६८७ अर्ज

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

SCROLL FOR NEXT