मुंबई

‘आयडॉल’मध्ये आता एमएमएस आणि एमसीएचे अभ्यासक्रम

CD

मुंबई, ता. १० : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी एआयसीटीई व यूजीसीने एमएमएस व एमसीए अशा दोन अभ्यासक्रमांना परवानगी दिली आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून एमएमएस व एमसीएचे शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

नवीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून बुधवारपासून (ता. १२) सुरू होत असून शेवटची तारीख २४ जुलै २०२३ आहे. एमएमएस व एमसीएची प्रवेश परीक्षा रविवारी, १३ ऑगस्ट २०२३ रोजी ऑनलाईन होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) अभ्यासक्रमासाठी ७२० जागांची मान्यता दिली आहे. आयडॉलमधून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासक्रम होत आहे. तो एमबीए अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. दरम्‍यान, मुंबई विद्यापीठाने एमएमएस व एमसीएसारखे महत्त्वाचे अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून सुरू केले आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी व ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळू शकला नाही त्यांच्यासाठी एक संधी आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

दोन हजार जागांची मान्यता
आयडॉलमध्ये मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) असा दोन वर्षांचा सुधारित अभ्यासक्रम आहे. त्यासाठी एआयसीटीई व यूजीसीने दोन हजार जागांची मान्यता दिली आहे. एचआर, फायनान्स व मार्केटिंग अशा तीन विषयांत एमएमएस अभ्यासक्रम करता येतो. दोन्ही प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून मागविण्यात येत असून ते विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT