मुंबई

तुटलेल्या नातेसंबधाचा पाळीव प्राण्यांवरही परिणाम!तुटलेल्या नातेसंबधाचा पाळीव प्राण्यांवरही परिणाम!

CD

मुंबई, ता. ११ : नाती तुटली की त्याचा परिणाम घरातील पाळीव प्राण्यांवरही होत असतो, असे निरीक्षण मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केले आहे. पाळीव प्राणी म्हणजे उत्तम जीवनशैलीचा भाग आहे. ते आपल्या आयुष्याचा भाग आहेत आणि निकोप आरोग्यासाठी आवश्यक आहेत; मात्र घरातील बिघडलेल्या नात्यामुळे त्यांनाही भावनिक हानी सहन करावी लागते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

एका ५५ वर्षीय महिलेने पतीकडून प्राण्यांच्या देखभालीसाठी आणि स्वतःच्या वैद्यकीय उपचारासाठी वाढीव पोटगी मागितली होती. पतीने त्याला विरोध केला होता; मात्र महानगर दंडाधिकारी न्यायालयाने महिलेची मागणी मान्य केली असून अर्ज दाखल केल्यापासून प्रतिमहिना ५० हजार रुपये देण्याचे आदेश पतीला दिले आहेत.

पत्नीकडे तीन श्वान आहेत. पतीने तिला पोटगी देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्याची पूर्तता केली नाही, असा आरोप तिने केला होता. पतीच्या विरोधात तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार नोंदवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

Gas Cylinder Shortage : कुंपणच शेत खातेय! हॉटेल सुरू, पण घरगुती गॅस टंचाई; नागरिकांचा संताप टोकाला, बुकिंग करूनही प्रतीक्षा

Food Poisioning : शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना विषबाधा; सर्व विद्यार्थिनीं धोक्याबाहेर

SCROLL FOR NEXT