मुंबई

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य हेल्पलाईन

CD

मुंबई, ता. १३ : सध्याची बदलती जीवनशैली, शिक्षण-अभ्यासक्रमाची भीती, पालकांचा दबाव आणि वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थी नैराश्यात येऊन आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली असून वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टोल फ्री मानसिक आरोग्य हेल्पलाईन सुरू केली आहे. १४४९९ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर कॉल करून विद्यार्थ्यांना त्यांच्या तणावावर उपाय मिळू शकतो.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हेल्पलाईनचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.
गिरीश महाजन म्हणाले, की अभ्यासाची बदलती पद्धत आणि स्पर्धात्मक वातावरणातील वाढत्या ताण-तणावासोबतच कोणताही बदल सहजतेने हाताळला गेला पाहिजे. त्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन होणार
पुण्यातील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थमधून सुरू झालेल्या हेल्पलाईनवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तिथे विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबाबत समुपदेशन व उपचार दिले जातील. हेल्पलाईनच्या अनावरणप्रसंगी विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक अजय चंदनवाले इत्यादींसह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT