मुंबई

किडनी ग्रस्त रुग्णांना दिलासा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सध्या किडनीच्या आजारात वाढ झाल्याने रुग्णांना डायलिसिस मोठ्या प्रमाणावर करावे लागते. त्‍यातच खासगी डायलिसिसचा खर्च सर्वसामान्‍यांना परवडत नाही. त्यामुळे आता आऊटडोअर म्हणजेच ठराविक वेळी डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांना शासकीय तसेच महापालिकेच्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तातडीने कार्यवाही करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
किडनीची कार्यक्षमता कमी असल्यावर किंवा किडनी निकामी अवस्थेत असताना डायलिसिसची गरज लागते. रुग्ण दाखल असताना डायलिसिसची अडचण येत नाही; मात्र घरी पाठवल्यावर ठराविक वेळी त्याला डायलिसिस करण्यास सांगण्यात येते. त्‍यासाठी सुमारे ७०० ते ३५०० रुपये खर्च येतो. त्यामुळे इतका खर्च सर्वसामान्‍यांना परवडत नाही. यातून अनेकदा योग्य वेळी डायलिसिस घेणे रुग्णाकडून टाळले जाते. भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव यांनी आऊटडोर रुग्णांना डायलिसिसला येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे समस्या मांडली. त्यामुळे त्यांनी जे. जे.सहित महापालिकेतील रुग्णालयात आऊटडोअर पेशंटसाठी डायलिसिस मशीन पुरवण्याची ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोटार वाहन विभागावर ‘लक्ष्मीची कृपा’; महापालिकेकडून नवीन वाहने, यंत्रांच्या खरेदीवर ५८ कोटींचा निधी मंजूर

अग्रलेख : आभासी आनंद, खऱ्या वेदना!

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT