मुंबई

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात दोन दिवसांचे चर्चासत्र

CD

मुंबई, ता. २६ : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त मुंबई मराठी ग्रंथालय संचालित इतिहास संशोधन मंडळामार्फत २९ आणि ३० जुलै रोजी दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी ‘गेल्या पंचवीस वर्षांतील मराठी साहित्य’ आणि दुसऱ्या दिवशी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि समकालीन महाराष्ट्र’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.
ग्रंथालयांच्या दादर येथील शारदा मंगल कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हे चर्चासत्र होणार असून याचे शनिवारी (ता. २९) रोजी १० वाजता ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्‌घाटन सत्राचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर असतील; तर बीजभाषण सुरेश द्वादशीवार यांचे होईल. पहिल्या सत्रात डॉ. दत्ता घोलप‍, डॉ. किरण येले, डॉ. प्रमोद मुनघाटे, सतीश तांबे, कवयित्री नीरजा, नाटककार प्रा. हिमांशू स्मार्त, डॉ. रणधीर शिंदे, गणेश कनाटे, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. मीनल सोहोनी, प्रा. मीना गोखले आपले विचार मांडतील. रविवारी (ता. ३०) संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि समकालीन महाराष्ट्र या विषयावर हे चर्चासत्र होईल. यात डॉ. दीपक पवार, डॉ. प्राची देशपांडे, सोमिनाथ घोळवे, परिणीती दांडेकर, जास्वंदी वांबूरकर, डॉ. शरद जावडेकर, डॉ. अविनाश पाटील, डॉ. नारायण भोसले, डॉ. भालचंद्र मुगणेकर, डॉ. श्रद्धा कुंभोजकर आदी आपले विचार मांडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT