मुंबई

वैद्यकीयचे‍ शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

CD

मुंबई, ता. २६ : मुंबई महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयातील २०१९-२० मधील एमबीबीएसच्या मागास व आर्थिक मागास आदी प्रवर्गातील सुमारे ७८ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सामाजिक न्याय विभागाने आदेश द्यावेत, अशी मागणी माजी सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात, शिवसेनेचे सिद्धेश कदम यांनी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही, त्यांना महाविद्यालयांकडून शुल्क भरण्यासाठी नोटिसा बजावल्या जात असल्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनीही पुढाकार घेण्याची मागणी माजी सिनेट सदस्य ॲड. थोरात यांनी केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये २०१९-२० मध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासंदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडून दोनदा मुदत देण्यात आली होती; मात्र त्या मुदतीत त्यांना अर्ज करता आला नसल्याने ते शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

Higher Education Protest: एम.फिल पात्र कंत्राटी प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी ‘स्पुक्टो’चे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत धरणे

Solapur Health Crisis: मंगळवेढ्यात २७हून अधिक आरोग्य पदे रिक्त; भैरवनाथ उद्योग समूहाचे अनिल सावंत यांची आरोग्यमंत्र्याकडे तात्काळ भरतीची मागणी

Highway Crime : गोलटगाव फाट्यावर भरधाव वाहनासमोर उडी; २२ वर्षीय तरुणाने जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT