मुंबई

आयआयटीतील मुख्य इमारतीला नंदन निलेकणीचे नाव

CD

मुंबई, ता. २६ : आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांचे नाव आयआयटीतील मुख्य इमारतीला देण्यात आले असून त्याच्या फलकाचे आज अनावरण करण्यात आले. आयआयटी मुंबईच्या स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हे नाव देण्यात आले. यासाठी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने निर्णय घेतला असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
आयआयटीच्या ६५ व्या वर्षपूर्तीनिमित्त संकुलात आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक, हितचिंतक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जागतिक स्तरावर आयआयटी मुंबईने निर्माण केलेले संशोधन आणि तंत्र शिक्षणातील स्थान याचा आढावा घेण्यात आला. या वेळी त्यांच्या कार्याची माहिती देत त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी नीलेकणी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मी या संस्थेचा माजी विद्यार्थी असून त्याचा मला अभिमान आहे. माझ्या आयुष्यातील जडणघडणीत आयआयटी मुंबईचे मोठे योगदान असून त्याचा मला कधीही विसर पडणार नाही.
या वेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी म्हणाले, आयआयटी ही नेहमीच ज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकीच्या क्षेत्रात संशोधन आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावी तंत्रज्ञान नवकल्पना विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चालना देते. आमच्या या यशात माजी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी मिळत असलेले सहकार्य हे येथील विद्यार्थ्यांना आणि संस्थेलाही पाठबळ देत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

Ashok Kharat भोंदुगिरीतून जमवली ५०० कोटींची मालमत्ता, नाशिकमध्ये ७० एकर जमीन; नातलगांच्या नावावरही संपत्ती

अफगाणिस्तानच्या जखमेवर भारताची फुंकर, पाकच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाठवली मदत

Sangli Politics Clash : 'पळवापळवीचे परिणाम जयंत पाटील, विशाल पाटलांना भोगावे लागतील'; चंद्रकांतदादांचा थेट इशारा, सांगलीतलं राजकारण तापणार!

SCROLL FOR NEXT