मुंबई

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातील गैरकारभारबाबत कार्यवाहीचे आदेश

CD

मुंबई, ता. ३१ : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेतील गैर-व्यवस्थापन, मनमानी कारभारासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उममुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचे निवेदन दिले होते, त्यावर फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

गलगली यांनी आपल्या निवेदनात मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात पदाधिकाऱ्यांनी केलेला गैरकारभार वाढतच चालला आहे व संस्थेच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त केली होती. तसेच २०२१ मध्ये संस्थेच्या घटना- नियमावलींचा भंग करून संस्थेच्या निवडणुका घेण्यात आल्या. या बेकायदा निवडणुकीच्या संदर्भात धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात तक्रारी आणि दावे दाखल करण्यात आले आहेत. विद्यमान परिस्थितीत संस्थेवर निदान ५ दावे वेगवेगळ्या न्यायपीठासमोर प्रलंबित असून त्यात फौजदारी गुन्ह्यांचा समावेश या संस्थेवर प्रशासक बसवून किंवा धर्मादाय आयुक्तांच्या अधिकारात अस्थायी समिती नियुक्त करून संस्थेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी गलगली यांनी केली होती.

निवेदनातील इतर आक्षेप
- मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची वादग्रस्त कार्यकारणी तात्काळ बरखास्त करावी व तेथे प्रशासक नेमावा.
-संग्रहालयाच्या निवडणुकांबाबत (२०२१) केलेल्या घटनाबाह्य कार्यवाहीची चौकशी करावी.
-संग्रहालयाचे उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या ‘शारदा-सिनेमा’ सुरू करण्याचे निर्देश द्यावेत.
- संग्रहालयाच्या परिसरातील बेकायदा पार्किंग, देण्यात आलेली कंत्राटे यांची चौकशी करावी.
- संस्थेच्या पुणे, चेंबूर, पंतनगर, वांद्रे येथील मालमत्तांत झालेल्या व्यवहारांची, भडकमकर मार्गावरील संस्थेच्या शाखेच्या बेकायदा विक्री या व्यवहारांची चौकशी करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT