मुंबई

मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला पुन्‍हा आयएसओ मानांकन

CD

मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला पुन्‍हा आयएसओ मानांकन
मुंबई, ता. १० : नावीन्यपूर्ण संकल्पना, विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, यासाठीची यंत्रणा आणि कार्यपद्धती अवलंबिल्याने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला सलग दुसऱ्यांदा आयएसओ मानांकन मिळाले आहे.
बुधवारी, मुंबईत झालेल्या ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आयएसओचे अधिकारी व्ही. बालकृष्णन यांच्या हस्ते मंत्री मुनगंटीवार यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.
गेल्या पाच वर्षांत मंत्री म्हणून मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला मिळालेला हा दुसरा बहुमान आहे. मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे निरसन व्हावे, त्यांना विनाकारण ये-जा करावी लागू नये, यासाठी त्यांच्या तक्रारींची, निवेदनाची दखल घेत त्यांच्या कामासंदर्भातील पाठपुरावा करण्याची कार्यपद्धती या कार्यालयात अवलंबली जात आहे. मंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी ते अगदी लिपिकापर्यंत या कामाची कार्यपद्धती ठरवून देण्यात येत असून त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत असल्याबाबत स्वत: मंत्री मुनगंटीवार सातत्याने आग्रही असतात आणि त्यासंदर्भात पाठपुरावाही करतात. त्यांच्या याच कार्यपद्धतीची दखल आयएसओ प्रमाणपत्राद्वारे सलग दुसऱ्यांदा घेण्यात आली आहे.
या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मंत्री मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांचेही अभिनंदन करून कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

SCROLL FOR NEXT