‘गोदरेज इंटेरिओ’ला
आधुनिकीकरणाचे काम
मुंबई, ता. १८ : ‘गोदरेज इंटेरिओ’ नवी मुंबईतील महाराष्ट्र सायबर सुरक्षा मुख्यालयात सुधारणा, नवीनीकरण व आधुनिकीकरणाचे काम करणार आहे. हा प्रकल्प सव्वा लाख चौरस फुटांवर पसरला आहे.
वेगवेगळ्या सुविधांसह ही पाच मजली इमारत आहे. यात सायबर सेल कॉल सेंटरसह कार्यालयीन जागा, केबिन, डिजिटल वर्ग, सेमिनार हॉल, प्रशिक्षण वर्ग, उपाहारगृह, साठवणुकीची जागा, सर्व्हिस रूम, गेम रूम आणि व्यायामशाळा यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात गतवर्षी सायबर गुन्ह्यांच्या घटनांत त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ७० टक्के वाढ झाली आहे; तर नोव्हेंबर २०२२ पर्यंत नोंदवलेल्या चार हजार २६८ सायबर फसवणुकीच्या प्रकरणांपैकी केवळ २७९ प्रकरणांचा छडा लागला आहे. या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाची स्थापना केली. ‘गोदरेज इंटेरिओ’सोबत सिव्हिल आणि इंटिरिअर, एमईपी (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग) आणि सोलर वॉटर हीटर सिस्टम, बाग-बगीच्याचे सौंदर्यीकरण (लँडस्केपिंग), बाहेरील भाग, फर्निचर आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांतील संबंधित कामे यासाठी हा करार केला आहे, असे ‘गोदरेज इंटेरिओ’चे व्यवसायप्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष स्वप्नील नगरकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.