मुंबई

टाटा रुग्णालयात प्रोटॉन थेरपी सुरू

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : टाटा मेमोरियल रुग्णालयातील कर्करोगग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी प्रोटॉन बीम थेरपी हे प्रगत तंत्रज्ञान वापरण्यास स्वातंत्र्यदिनी सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी वेगवेगळ्या हाडांच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांवर या प्रोटॉन थेरपीने उपचार केले गेले.
सार्वजनिक क्षेत्रात अशी सुविधा सुरू करणारे टाटा मेमोरियल रुग्णालय हे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. सध्या ही सुविधा देशातील खासगी क्षेत्रातील चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात उपलब्ध आहे. येथे या सुविधेसाठी किमान २० लाख रुपये खर्च करावे लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनी टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघर कॅम्पसमध्ये बहुप्रतीक्षित प्रोटॉन बीम थेरपी सुविधेचे उद्‍घाटन केले होते.
ही सुविधा सार्वजनिक सेटअपमध्ये देशातील पहिली आहे. ६० टक्के कर्करोग रुग्णांना अत्याधुनिक प्रोटॉन बीम उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. इतर ४० टक्के रुग्णांना भरीव सवलत मिळेल. या सुविधेचे उद्‍घाटन केल्यानंतर तीन महिन्यांनंतर या प्रगत तंत्रज्ञानाने कर्करोगाच्या रुग्णांवर थेट उपचार सुरू झाले आहेत.
टाटा मेमोरियल सेंटरचे उपसंचालक आणि प्रोटॉन सेंटरचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ लष्करे म्हणाले की, संचालक डॉ. राजेंद्र बडवे आणि खारघर अॅक्टरेकचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांच्या प्रयत्नांमुळे ही सुविधा सुरू झाली आहे. १५ ऑगस्टला दोन रुग्णांना प्रोटॉन बीम देण्यात आला आहे. या दोघांना हाडांचा कर्करोग झाला होता. यापैकी एक रुग्ण अगदी सारकोमाने; तर दुसरा रुग्ण कार्डोमा कर्करोगाने ग्रस्त होता. दोन्ही रुग्ण प्रौढ होते. सध्या प्रोटॉन बीमसाठी ६ ते ७ रुग्णांची निवड करण्यात आली आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने प्रोटॉन बीम दिला जाईल. ते म्हणाले की, सर्व रुग्णांना प्रोटॉनची आवश्यकता नसते.
कोणत्या रुग्णांना प्रोटॉन द्यायचे हे रुग्णालयातील तज्ज्ञांची टीम ठरवते.
...
जगभरात ३९ केंद्रे
प्रोटॉन थेरपी स्तन, अन्ननलिका, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट, स्त्रीरोग, डोके आणि मान, यकृत, फुप्फुस, स्वादुपिंड, प्रोस्टेट आणि मणक्याच्या कर्करोगात प्रभावी असल्याचे पुरावे आहेत. या संपूर्ण प्रक्रियेस ३० मिनिटे लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT