मुंबई

प्रतीक्षा नगर मध्ये सर्वाधिक नवरात्री उत्सव

CD

आदिशक्‍तीच्या जागरासाठी नवरात्रोत्‍सव मंडळे सज्‍ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : नवरात्रोत्‍सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सार्वजनिक मंडळे आदिशक्‍तीच्या जागरासाठी सज्‍ज झाली आहेत. कारागिर देवीच्या मूर्ती सजवण्यात दंग आहेत; तर दुसरीकडे काही मंडळांनी रविवारचा मुहूर्त साधत लालबाग-परळच्या कार्यशाळेतून दुर्गा देवीच्या मूर्ती मिरवणूक काढत मंडपात विराजमान केल्‍या आहेत. यंदा सर्वाधिक नवरात्री उत्सवांचे आयोजन हे सायन पूर्व येथील प्रतीक्षानगरमध्ये होत आहे.
प्रतीक्षानगरमध्ये १५-१६ प्रमुख नवरात्र मंडळे आहेत, त्यापैकी दोघांनी या वर्षी भगवान कृष्णाच्या संबंधी देखावा साकारण्यास सुरुवात केली आहे. एका मंडळाने मुंबईची आई भवानी साकारली असून तिची १८ फूट उंच मूर्ती तयार करण्यात आली आहे. ती मूर्तिकार अरुण दाते यांनी साकारली असल्‍याचे आयोजक प्रवीण मांजरेकर यांनी सांगितले.

कालिया मर्दन लक्ष वेधणार
प्रतीक्षानगरमध्ये यंदा मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी साकारलेली माऊलीच्या रूपातील मूर्ती लक्ष वेधणार आहे. त्यांनी या वेळी कालियामर्दन साकारले आहे. देवीची ६.५ फूट उंच मूर्ती असून कालियामर्दन देखाव्यामुळे ही उंची १२ फूट झाल्याची माहिती आयोजक अविनाश किरवे यांनी दिली.

सर्वांत उंच ३१ फुटी मूर्ती
खेतवाडी १२ व्या गल्लीतील ‘खेतवाडीची आई’ यांनी यंदा ३१ फूट उंच मूर्ती विराजमान करण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्तिकार अरुण दाते यांनी आपल्या कृतीतून देवीची ही कलाकृती साकारली आहे. देवी पांढऱ्या घोड्यावर स्वार झाली आहे; तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त भवानी देवीच्या उपासनेतून शिवाजी महाराजांनी शक्ती प्राप्त केली, असा देखावा खेतवाडीच्या मंडळाने उभारला असून देवी तिच्या अष्टभूजा (आठ सशस्त्र) अवतारात गदा, तलवार आणि त्रिशूळ असे शस्त्र घेऊन सज्ज असल्याचे दाखवण्यात आले आहे.

आम्ही नेहमी थीमवर आधारित उत्सव साजरा करतो. या वर्षी आम्ही ‘श्री कृष्ण गाथा’ निवडली आहे. कृष्णाच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना मागील पडद्यावर चित्रित केल्या आहेत. त्यामधून भाविकांना चांगला संदेश दिला जात आहे.
- प्रवीण मांजरेकर, आयोजक, मुंबईची आई भवानी मंडळ

आमचे मंडळ ४१ वर्षे जुने असून १९८२ मध्ये अंबे देवीच्या फोटो फ्रेमच्या पूजेने नवरात्रोत्‍सवाची सुरुवात झाली. आम्ही पेणमधून छोट्या मूर्ती आणायला प्रथम सुरुवात केली. सुरुवातीला ८ फूट, नंतर १२ फूट पुढे २० फूट मूर्तींपर्यंत पोहोचलो. या वर्षी आम्ही ३१ फूट उंच मूर्ती आणत आहोत.
- राजेश मगम, प्रमुख, खेतवाडीची आई मंडळ

वाकोलासाठी मनसादेवी हिची सर्प रूपी १२ फूट उंच मूर्ती साकारली आहे. कामाठीपुरा येथील रेड लाईट एरियातील एका अतिशय सर्जनशील मंडळाने आम्हाला ‘खोडियार मा’ची मूर्ती बनवायला लावली आहे.
- रेश्मा खातू, मालक, विजय खातू स्टुडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT