मुंबई

आयआरएम एनर्जी आयपीओ १७ ऑक्टोबरपासून खुला

CD

मुंबई, ता. १२ : नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारी कंपनी आयआरएम एनर्जीच्या आयपीओसाठी ४८० ते ५०५ रुपये किंमतपट्टा ठेवण्यात आला असून यात १७ ते २० ऑक्टोबरदरम्यान गुंतवणूक करता येईल. कंपनीचे अध्यक्ष महेश्वर साहू यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

या आयपीओमध्ये किमान २९ शेअरसाठी व त्यापुढे २९ शेअरच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. कर्मचाऱ्यांना ४८ रुपयांची सवलत मिळेल. हा इशू ५१८ ते ५४५ कोटी रुपयांचा असून यातील ३०७ कोटी रुपये तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली विभागातील वायू वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी भांडवली खर्च म्हणून वापरला जाईल; तर १३५ कोटी रुपये कर्जफेडीसाठी वापरले जातील. बनासकाठा (गुजरात), फत्तेगड साहेब (पंजाब), दीव, गीर, सोमनाथ (गुजरात) तसेच तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथे त्यांच्यातर्फे १४८ कंपन्यांना, २१९ व्यापारी आस्थापनांना, तसेच ५२,४५४ वैयक्तिक ग्राहकांना नैसर्गिक वायू पुरवठा केला जातो. त्यांचे एकूण सत्तर सीएनजी फिलिंग स्टेशन आहेत. जपानमधील मोठी नैसर्गिक वायू कंपनी शीजगॅस सोबत या कंपनीने सहकार्य करार केला आहे. कंपनीचा महसूल २०२१ मध्ये १८९ कोटी रुपये होता. तो यावर्षी ९८० कोटी रुपये झाला आहे. याच कालावधीत त्यांचा नफा ३४ कोटी रुपयांवरून ६३ कोटी रुपयांवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT