Mumbai Metro  sakal
मुंबई

Mumbai Metro: ‘मेट्रो लाईन २ ब’ चे काम थांबवणार! धुळीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी BMC ने दिली नोटीस

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने कडक उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिकेकडून केवळ खासगीच नाही तर शासकीय प्रकल्पांवरही कारवाई सुरू केली आहे. बीकेसीतील मेट्रो लाईन २ ब प्रकल्पाच्या कामाला महापालिकेच्यावतीने काम थांबवण्याची नोटीस जारी केली आहे.

महापालिकेच्या एच पूर्व विभागाच्यावतीने ही नोटीस जारी करण्यात आली आहे. महापालिकेने जारी केलेल्या हवेतील प्रदुषणासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांच्या नियमांचे पालन न केल्याने ही नोटीस देण्यात आली आहे. मेट्रो लाईन २ बी प्रकल्पांतर्गत कामांच्या ठिकाणी अशाप्रकारची उपाययोजना करण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२३ ला नोटीस जारी केल्यानंतरही या नियमांचे पालन होत नसल्याने ४ नोव्हेंबर २०२३ रोजी काम थांबवण्यासंदर्भातील नोटीस अर्थात स्टॉप वर्क नोटीस जारी करण्यात आली होती.

त्यानंतरही या प्रकल्पांमध्ये प्रदुषणासंदर्भातील प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात नसल्याच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे अखेर बुधवारी अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी एच-पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासह बीकेसी जी ब्लॉक येथील या प्रकल्पाच्या घटनास्थळाची पाहणी केली.

त्यावेळीही नियमांचे उल्लंघन होताना दिसल्याने या प्रकल्पाचे कंत्राटदार जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टचे सहायक महाव्यवस्थापक यांच्या नावे नोटीस जारी करण्यात आली आहे. यामध्ये या मेट्रो प्रकल्पाचे काम थांबवण्याचे निर्देश दिले असून प्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास आपल्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; चार तरुण गंभीर जखमी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT