मुंबई

हेरिटेज नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दणका, -महापालिकेने पाठवली नोटीस ,

CD

हेरिटेज नियमांचे उल्लंघन
महापालिकेने पाठवली नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः नियमांचे उल्लघन करून हेरिटेज वास्तूंना धोका निर्णाण करणारी तसेच प्रदूषणास कराणीभूत ठरणारी बांधकामे पालिकेच्या रडारवर आली आहेत. दक्षिण मुंबईतील अशा बांधकामांना पालिकेने नोटीस बजावून काम बंद पाडले आहे, तसेच अशा कामांचा शोध महापालिकेचे पथक घेत आहे.
दक्षिण मुंबईतील अनेक इमारती ब्रिटिशकालीन आहेत. यातील बहुतांश इमारती आजही सर्वांना भुरळ घालतात. यातील अनेक इमारतींचा समावेश हेरिटेज वास्तूमध्ये करण्यात आला आहे. या इमारती आणि त्यांचे महत्त्व कायम जपले जावे यासाठी महापालिकेने हेरिटेज संरक्षण समितीही निर्माण केली आहे. या समितीने हेरिटेज वास्तूंसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण नियम व अटी तयार केल्या आहेत. इमारतींचे मालक आणि बांधकाम व्यावसायिक यांनी याचे पालन करणे बंधनकारक आहे.

समितीकडून पाहणी
दक्षिण मुंबईतील हेरिटेज इमारती असलेल्या भागात पालिकेचे हेरिटेज समितीचे पथक गस्त घालत असते. मुंबईच्या कुलाबा परिसरात मादाम कामा रोडवर स्थित अमरचंद मेन्शन या हेरिटेज इमारतीमध्ये हेरिटेज नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे या समितिच्या लक्षात आले. या समितीसह पालिका प्रशासनाने याची तातडीने गांभीर्याने दखल घेत कारवाई सुरू केली.

काय आढळले?
हेरिटेज समितीने इमारतींची पाहणी केली असता त्यांना या ठिकाणी नियमांचे उल्लंघन सुरू असल्याचे आढळले. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या सी-१ फ्लॅट मध्ये बांधकाम सुरू असल्याचे आढळून आले. महत्त्‍वाचे म्हणजे हे बांधकाम करण्यासाठी फ्लॅटधारकाने महापालिकेच्या हेरिटेज कमिटीची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. या बांधकामामुळे हेरिटेज इमारतीला धोका निर्माण होऊन वास्तूचे मूळ स्वरूप नष्ट होण्याचा धोका पालिका प्रशासनाच्या पथकाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाला. महापालिकेने फ्लॅटचे मालक, गाळाधारक फरहाद अली बोमानजी, रशीद युसुफ झवेरी आणि वरून बंगेरा यांना तिथे सुरू असलेले बांधकाम त्वरित बंद करण्याचा निर्देश देत नोटीस पाठवली आहे.

प्रदूषण नियंत्रण नियमही पायदळी
इमारतीमध्ये अनियमित काम करत असताना प्रदूषण नियंत्रण नियमांचेही उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी अलीकडेच महापालिकेने जी नियमावली जाहीर केली आहे, त्याकडेदेखील बांधकाम करताना दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पालिकेने या इमारतीवर कडक कारवाई केली आहे.

ईडीचीही नजर
अमरचंद मेन्शन या इमारतीमधील फ्लॅट पूर्वी जेट एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचा होता; मात्र हा फ्लॅट जेट एअरवेजने काही महिन्यांपूर्वीच विकला. जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक, संचालक नरेश गोयल होते. नरेश गोयल यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप झाले असून त्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. दरम्यान, या फ्लॅटचा व्यवहारही गोयल यांनी लपवलाय का, याचीही चौकशी सध्या ईडी करत आहे. आता वरील फ्लॅटच्या व्यवहाराचीदेखील ईडी आणि आयकर विभागाकडूनही चौकशी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT