मुंबई

अनधिकृत फलक छापून देणाऱ्या ‘प्रिंटिंग प्रेस’ पालिकेच्या रडारवर

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : अनधिकृत फलक छपाई करून देणाऱ्या ‘प्रिंटिंग प्रेस’ पालिकेच्या रडारवर आल्या आहेत. अशा प्रिंटिंग प्रेसना कायदेशीर नोटिसा बजावण्यात येणार आहेत. अनधिकृत फलक, बॅनर्स, बेवारस वाहने, पदपथांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी आजच्या बैठकीत हे निर्देश दिले.

मुंबई महानगरातील अतिक्रमण निर्मूलनविषयक कार्यवाहीचा आढावा डॉ. अश्विनी जोशी यांनी आज घेतला. महापालिकेने मुंबई सुशोभीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. मुंबई अधिकाधिक सुंदर, स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. असे असताना, रस्ते दुभाजकांमध्ये लावलेल्या अनधिकृत फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. कोणतीही परवानगी न घेता फलक लावले जातात. त्यामुळे अशा अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह ते छपाई करून देणाऱ्या प्रिंटर्स व्यावसायिकांनाही नोटीस बजावण्याचे निर्देश डॉ. जोशी यांनी बैठकीत दिले. सोबतच पालिका हद्दीत आढळून येणारी बेवारस व भंगार वाहने हटविण्याची कारवाई करावी. पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सातत्याने राबवावी. यापुढे या कारवाईला वेग देण्यात यावा, त्यासाठी प्रसंगी पोलिसांची मदत लागली तरी घ्यावी, असे निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी दिले.

...
समन्वयाने मोहीम राबवावी
पालिकेच्या विविध कारवायांवेळी सर्व प्रभाग कार्यालयांतील तसेच विविध खात्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने मोहीम राबवावी. तसेच करण्यात येणाऱ्या कारवाईचा दररोजचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करावा, असे निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घ्या’; SIR वरून अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

Asian Games 2026 : अफगाणिस्तान, मलेशिया यांचा विजय; टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत कोण भिडणार? जाणून घ्या समीकरण

पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंदची हाक

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Mirkarwada Jetty Cleanup : विनावापर नौकांच्या केबिन हटवल्या मिरकरवाड्यात धडक कारवाई; जेटींनी घेतला मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT