मुंबई

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पुलांचा मेक ओव्हर होणार, १३ कोटींचा खर्च,

CD

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पुलांचा मेकओव्हर
- मुंबई सुशोभीकरण प्रकल्‍पांतर्गत १३ कोटी खर्च करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई सुशोभीकरण प्रकल्‍पांतर्गत पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील पुलांचा मेकओव्हर होणार आहे. महामार्गावरील पुलांच्या खालील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण केले जाईल. आर मध्य विभाग कार्यालयाच्या माध्यमातून होणाऱ्या या कामावर १३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
सुशोभीकरणासाठी मागाठाणे उड्डाणपूल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उड्डाणपुलाची निवड केली आहे. या पुलांची आकर्षक रंगरंगोटी केली जाणार आहे. पुलाच्या भिंतीवर निसर्ग, प्राणी यांचे चित्रे रेखाटली जाणार आहेत.
पुलांखालील मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्थादेखील असेल. इतर मोकळ्या जागेमध्ये अतिक्रमण होऊ नये, यासाठी फुलांची झाडे लावून छोटे उद्यान विकसित केले जाणार आहेत. या पुलांखाली सर्कल असून वाहनांना व्यवस्थित वळण घेता यावे, यासाठी वेगळी मार्गिका तयारी केली जाणार आहे.
सध्या पुलाखालील मोकळ्या जागेमध्ये समाजकंटकांचा वावर असून अतिक्रमणे वाढली आहेत. फेरीवाले आपले साहित्‍य या जागेत ठेवत असल्‍याने कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. पुलांखाली सार्वजनिक शौचालय उभारणे शक्य आहे का, याची चाचपणीदेखील केली जाणार आहे.

निविदा प्रक्रिया सुरू
जे. जे. उड्डाणपुलानंतर आता मुंबईतील या दोन पुलांचा मेकओव्हर केला जात आहे. मागाठाणे पुलासाठी सहा कोटी ५३ लाख तीन हजार १५० रुपये आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुलासाठी ५ कोटी ९१ लाख ७० हजार १५१ रुपये खर्च केले जात आहेत. पालिकेने यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT