मुंबई

शालेय शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला हवे

CD

मुंबई, ता. २८ : माझे शिक्षण मुंबईतील खेतवाडी येथील महापालिकेच्या मराठी शाळेतून झाले. मी मराठीतून शिकलो म्हणून मला संशोधक वैज्ञानिक होण्यासाठी कोणताही फरक पडला नाही. आज मराठी शाळेतून, आपल्या मातृभाषेतून शिकलेले अनेक शास्त्रज्ञ, संशोधक हे एका शिखरावर जाऊन पोहोचले आहेत. आपल्या मातृभाषेतून ज्ञान-विज्ञान तंत्रज्ञान हे अधिक लवकर कळते. त्यामुळे शालेय शिक्षणाची सुरुवातच मातृभाषेतून झाली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
नवी मुंबईतील वाशी येथे भरलेल्या विश्‍व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मराठीची वैश्‍विकता ज्ञान-तंत्रज्ञान या विषयावरील चर्चासत्रात डॉ. माशेलकर बोलत होते. विज्ञान समजले पाहिजे, याविषयीचे कुतूहल आणि त्यासंदर्भातील प्रश्‍न हे आपल्या मातृभाषेतूनच विचारले पाहिजेत. त्यासाठीच्या संकल्पना अधिक विकसित झाल्या, तर मातृभाषेतील महत्त्व अधिक अधोरेखित होईल. आज आपण डिजिटलचा गाजावाजा होत असला, तरी गुगल हे शिक्षकाची जागा कधीच घेऊ शकत नाही, याचा विचार करायला हवा. विज्ञान चमत्कार करू शकते, त्यामुळे सर्व शक्ती केंद्रित केल्यावर आपण काही तरी करू शकतो, हे मला माझ्या गुरूंच्या शिकवणीतून शिकायला मिळाले. त्यामुळे विज्ञानासंदर्भात एकूण काम करू लागलो आणि मला यश मिळाले, असे डॉ. माशेलकर म्हणाले. मराठी भाषेची वैश्‍विक व्याप्ती खूप मोठी आहे. मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असला, तरी तो मराठी राहतो. त्याच्यात मराठी संस्कृती रुजलेली आहे. या मराठी माणसांत देशभक्ती आणि तिचा संगम झालेला असून ही ओळख जगभरातील मराठी माणसांत असल्याचे ते म्हणाले.
----
एकवेळ तंत्रज्ञानात चीनच्या पुढे होतो!
आपण एकीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भात गरुडझेप घेत होतो. परम कॉम्प्युटर निर्माण झाल्यानंतर आपण चीनच्याही पुढे होतो. त्यासंदर्भातील अनेक तंत्रज्ञान आपण जगभरात पाठवत होतो, तसेच अंतराळ क्षेत्रात आपल्या अनेक संशोधकांनी मोठे योगदान दिले. यातील बहुतेक संशोधक हे मातृभाषेतच शिकले आणि त्यांनी जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT