Mumbai Pollution sakal
मुंबई

Mumbai Pollution: पुन्हा उंचावली मुंबईच्या प्रदूषणाची पातळी; भायखळा रेड झोनमध्ये

कुलाबा, अंधेरी, वरळी, बीकेसी, चेंबूरमधील हवनेचा स्तरही घसरला आहे.

CD

Mumbai Pollution: मुंबईतील निवळलेल्या प्रदूषणाच्या पातळीने आता पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील हवेचा स्तर वाईट नोंदवल्याने तो परिसर रेड झोनमध्ये होता; तर कुलाबा, अंधेरी, वरळी, बीकेसी, चेंबूरमधील हवनेचा स्तरही घसरला आहे.

मुंबईतील सर्वाधिक वाईट हवा गुणवत्तेची नोंद भायखळा येथे ३०४ इतकी झाली आहे. यामुळे हा परिसर रेड झोनमध्ये आहे. यासह शिवडी २८१, वरळी २५५, बीकेसी २४८, माझगाव २२३, कुलाबा २१८, चेंबूर २०५, अंधेरी २०१ इतक्या हवा गुणवत्ता निर्देशांकासह वाईट हवेची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभर मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यात पालिका प्रशासनाला यश आले होते. धूळ नियंत्रणासाठी पाणी मारून रस्ते धुतले जात आहेत.

परिणामी, धूळ नियंत्रणात येऊन प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले होते. यामुळे गेल्या चार आठवड्यांपासून मुंबई ग्रीन झोनमध्ये दिसत होती. आज मात्र अचानकपणे मुंबईतील प्रदूषण पुन्हा एकदा वाढल्याचे दिसले. असे असले तरी मालाडमध्ये हवेची स्थिती चांगली आहे. मालाडमध्ये ४१ हवा गुणवत्ता निर्देशांकासह उत्तम हवेची नोंद झाली आहे. विले पार्ले येथे हवा गुणवत्ता निर्देशांक ९० आहे; तर संपूर्ण मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक १५३ सह मध्यम नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT