Mumbai Politics varsha gayakvad  sakal
मुंबई

Mumbai News: धारावीकरांना मालकी हक्कांपासून वंचित ठेवण्याचा डाव : वर्षा गायकवाड

रेल्वे वसाहतीतील कुटुंबांची कायमस्वरूपी पुनर्वसन योजना जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत रेल्वे वसाहतीसुद्धा इतरत्र स्थलांतरित करू नयेत

सकाळ वृत्तसेवा


Mumbai News: धारावीतील पुनर्विकास प्रकल्प हा धारावीकरांच्या अस्तित्वावर घाला घालणारा आहे. धारावीकरांना मूळ जागेवरून हुसकावण्याचे भाजप सरकारचे षड्‌यंत्र आहे, त्याला धारावीकरांचा तीव्र विरोध आहे. (Mumbai News)

रेल्वेच्या जागेवर ज्या इमारती उभ्या राहतील, त्यातील रहिवाशांना पूर्ण मालकी हक्क कधीही मिळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. धारावी पुनर्विकासाबाबतही खूपच धक्कादायक असून पुनर्वसन इमारती रेल्वेच्या जागेवर बांधण्यात येऊ नयेत, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे. (varsha gayakwad)

त्याचबरोबर रेल्वे वसाहतीतील कुटुंबांची कायमस्वरूपी पुनर्वसन योजना जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत रेल्वे वसाहतीसुद्धा इतरत्र स्थलांतरित करू नयेत, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

धारावी पुनर्विकास महाघोटाळा प्रकल्प धारावीकरांचे हक्क पायदळी तुडवत आहे. या महाघोटाळ्यामुळे सात लाखांहून अधिक धारावीकरांना धारावीतून हलवण्याचा कट रचला गेला आहे. ज्यांना ‘पात्र’ म्हणून धारावीतच पुनर्वसन करण्यात येणार आहे, त्यापैकी अनेकांना पूर्ण मालकीचे घर मिळू शकणार नाही.

अदाणी-प्रणित धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा.लि. प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या रेल्वेच्या जागा पोटभाडेपट्ट्याने देता येणार नाहीत, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ या कुटुंबांना मालकी हक्काचे घर मिळणार नाही व त्यांना बेघर करण्याचा हा डाव आहे, हे आम्ही कदापि सहन करणार नाही.

रेल्वेच्या जागेवर अदाणीला काय बांधायचे ते बांधावे; परंतु स्थानिक धारावीकरांचे पुनर्वसन मात्र त्या जागेवर करू नये, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.(maharashtra news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT