Mumbai-Goa Highway  sakal
मुंबई

Mumbai News: मुंबई-गोवा महामार्गावर १० वर्षांत झाला 'इतक्या' हजार कोटींचा खर्च

Mumbai News: दहा वर्षांत एकूण ६ हजार कोटी खर्च करण्यात आले असून दुरुस्तीवर तब्बल १९२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे | A total of 6 thousand crores have been spent in ten years and as much as 192 crores have been spent on repairs

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणावर गेल्या दहा वर्षांत एकूण ६ हजार कोटी खर्च करण्यात आले असून दुरुस्तीवर तब्बल १९२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

मात्र अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून भविष्यात त्यावर आणखी खर्च होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या खर्चाच्या तुलनेत कामाचा दर्जा सुमार असून याची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केली आहे.(Mumbai-Goa Highway)

मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पावरील खर्चाची माहिती जितेंद्र घाडगे यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागितली होती. केंद्र सरकारच्या ‘एनएचएआय’ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गाच्या ४७१ किमी पट्ट्यांपैकी, ८४.६ किमी रस्त्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, तर उर्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे.

त्यानुसार २०१३ पासून, त्यांनी नवीन रस्त्यांवर १,७७९ कोटी ८५ लाख ५७ हजार ११० रुपये आणि दुरुस्तीच्या कामावर १४५ कोटी ८२ लाख ३६ हजार ९२६ रुपये खर्च करण्यात आले आहेत.

दुसरीकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पेण कार्यालयाचे अभियंता आर. बी. कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चौपदरी महामार्गासाठी २,३५४ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात आले असून, दुरुस्तीच्या कामासाठी कोणताही खर्च करण्यात आलेला नाही. यामध्ये नवीन रस्त्यांची देखभाल न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रत्नागिरी विभागाने सांगितले की २०१८ ते २०२३ पर्यंत नवीन रस्त्यांवर १,८१५ कोटी ८५ लाख ५० हजार ९५९ रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर २०११ ते २०२३ पर्यंत दुरुस्तीच्या कामावर ४६ कोटी २० लाख ७९ हजार ४८३ रुपये कोटी खर्च करण्यात आले आहेत; तर रस्ते कामास विलंब केल्याबद्दल अनुक्रमे ५ आणि ८ कोटी रुपये दंड ठोठावला असून हा दंड वसूल केला गेला की नाही, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

एक दशकाहून अधिक काळ बांधकाम सुरू असलेल्या या महामार्गावर २०१० पासून कोकण पट्ट्यातील २५०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या कामाची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले पाहिजेत.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आणि एनएचएआयने संपूर्ण भारतभर केलेल्या चांगल्या कामाचा विचार करता, संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग केंद्र सरकारकडे सोपविण्याची वेळ आली आहे.


- जितेंद्र घाडगे, द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT