मुंबई

राज्यात एक कोटी मुलांच्या लसीकरणाचे लक्ष्य

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. यात शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस दिला जात आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. यात एक कोटी १३ लाख ७० हजार ४४३ बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभरात ८९,२९९ बूथ उभारण्यात आले असून सुमारे दोन लाख २१ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात असतील. याशिवाय तीन कोटींहून अधिक घरांना मोहिमेअंतर्गत भेट दिली जाणार आहे. एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, यासाठी फिरती पथके आणि रात्रीची पथकेही कार्यरत असणार आहेत.

पल्स पोलिओ मोहिमेसंदर्भात राज्यस्तरीय टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली असून सर्व जिल्ह्यांतही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ची बैठक घेण्यात आली. अतिजोखमीच्या क्षेत्राकडे अधिक लक्ष देऊन एकही बालक पोलिओ लशीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तराप्रमाणेच तालुका आणि ग्रामीणस्तरावरही लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने या लसीकरण मोहिमेसाठी आपली यंत्रणा सज्ज केली असून जिल्हा, तालुका आणि ग्रामीणस्तरावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील पाच वर्षांपर्यंतचा एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टीम इंडिया नंबर १ ! झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील विजयानंतर इंग्लंडला मागे फेकले

अभिजीतच्या घरी गेले शिंदेंचे मंत्री, आई-वडिलांची घेतली भेट; काय घडलं? कारण आलं समोर

Latest Marathi News Update : मुंबई लोकलमध्ये थरार, विलेपार्ले स्थानकात ५ स्फोटांचा आवाज

पुरात वाहून गेला हत्ती! नागालँडमधून १०० किमी दूर पोहोचला आसामला, वनविभागाच्या प्रयत्नामुळे वाचला जीव

Jantar Mantar: देशातल्या 'या' शहरांमध्ये आहे दिल्लीसारखं जंतर-मंतर! वाचा वेधशाळांचा रंजक इतिहास!

SCROLL FOR NEXT