eknath shinde sakal
मुंबई

Maharashtra News: राज्य सरकार २१ कोटींची खरेदी करणार सुतळी; जाणून घ्या कारण

पुन्हा १० कोटींच्या वाढीव खरेदीस मान्यता देण्यात आली आहे | Again an incremental purchase of 10 crores has been approved

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: हिवाळी अधिवेशनात टीकेचा विषय राहिलेल्या सुतळी खरेदीवर अखेर राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. विभागाने २१ कोटी ६७ लाख रुपयांच्या सुतळी खरेदीस मान्यता दिली आहे. यात पुन्हा १० कोटींच्या वाढीव खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. (eknath shiden)

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागाच्या सुतळी खरेदीवर हिवाळी अधिवेशनात जोरदार चर्चा झाली होती. विभागाकडून ७२ रुपये किलोंची सुतळी ४२० रुपयांनी खरेदी होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांचे आमदार जयंत पाटील, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात यांनी केला होता. मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी सदस्यांमध्ये यावरून जोरदार खडाजंगी झाली होती. यावेळी मंत्री भुजबळ यांनी अशा गोष्टी होत नसल्याचे सांगितले होते. (chaggan bhujbal news)

विरोधकांनी केलेल्या आरोपानंतरही गुरुवारी (ता.७) अन्न नागरी पुरवठा विभागाने सुतळीगाठी खरेदीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये पोती शिवण्यासाठी वीज उपलब्ध असते. मात्र, लोडशेडिंग व अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होतो. काहीवेळा पोती शिवणयंत्र नादुरुस्त झाल्यास शासकीय धान्य गोदामांमधील पोती शिवण्यासाठी सुतळी खरेदीस मान्यता दिली असल्याचे म्हटले आहे.

वर्षभराच्या कालावधीसाठी साधारण ५ लाख २८ हजार ६४७ किलोची सुतळी लागणार आहे. ही सुतळी खरेदी ४१० रुपये किलो दराने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या २१ कोटी ६७ लाख ४५ हजार २७० रुपयांच्या खर्चास विभागीय भांडार खरेदी समितीने मान्यता दिली होती . यात पुन्हा १० कोटींच्या वाढीव सुतळी खरेदीस मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

SCROLL FOR NEXT