Mumbai University BCom Semester 6 examination begin today Sakal
मुंबई

MU BCom Exam : मुंबई विद्यापीठाच्या ‘बीकॉम सत्र-६’ची परीक्षा आजपासून; ५४ हजार ८३४ विद्यार्थी देणार परीक्षा

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४च्या उन्हाळी सत्राची ‘बीकॉम सत्र ६’ची परीक्षा आजपासून (ता. २२) सुरू होत आहे. या परीक्षेला ५४ हजार ८३४ विद्यार्थी बसणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४च्या उन्हाळी सत्राची ‘बीकॉम सत्र ६’ची परीक्षा आजपासून (ता. २२) सुरू होत आहे. या परीक्षेला ५४ हजार ८३४ विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षा मुंबई विद्यापीठाच्या मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील २४९ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.

विद्यापीठाने सर्व लीड महाविद्यालयाची एक बैठक घेऊन उन्हाळी सत्राच्या सर्व परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला. परीक्षा घेणे आणि त्याचबरोबर मूल्यांकन करणे हे महाविद्यालयाला आवश्यक आहे.

प्रत्येक महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थी संख्येच्या दीडपट उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. जेणेकरून निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येईल. या सर्व लीड महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी सांगितले.

सर्व महाविद्यालयाने परीक्षेची संपूर्ण तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी परीक्षेची प्रवेशपत्रे, विविध महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रे याचा आढावा परीक्षा आणि निकाल कक्षाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे यांनी घेतला होता.

महाविद्यालयाला परीक्षेचे साहित्य आणि उत्तरपत्रिका तसेच ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीचा आढावा कॅपचे उपकुलसचिव संतोष सोनावणे यांनी घेतला होता. परीक्षेची प्रश्‍नपत्रिका डिजिटल इलेक्ट्रॉनिक पेपर डिलिव्हरी पद्धतीमार्फत २४९ परीक्षा केंद्रांना पाठविण्यात येणार आहे. याचा आढावा उपकुलसचिव सुनील खतेले यांनी घेतला.

या परीक्षेचे मूल्यांकन ऑनस्क्रीन मार्किंगद्वारे करण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन उपस्थिती, बारकोड आणि विद्यार्थ्यांची सर्व माहिती असणाऱ्या स्टीकरचाही वापर करण्यात येत आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

उन्हाळी सत्रातील परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने संपूर्ण तयारी केली आहे. या परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येईल. परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा!
- डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

विद्यार्थी अन्‌ परीक्षा केंद्रे
एकूण विद्यार्थी : ५४,८३४
परीक्षा केंद्रे : २४९
विद्यार्थिनी : २६,१७२
विद्यार्थी : २८,६६२
नियमित विद्यार्थी : ४८,३१५
पुनर्परीक्षार्थी : ६,५१९
दिव्यांग विद्यार्थी : १९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

Pune News : भाजपने कंबर कसली! मोहोळ, बीडकर, लांडगे, कुल आणि जगताप यांच्याकडे दिली महत्वाची जबाबदारी

Farmer Fraud : ऊसतोड कराराच्या नावाखाली बार्शीच्या शेतकऱ्याची सहा लाख रुपयांची फसवणूक; मुकादमा विरोधात गुन्हा दाखल!

Pune Fraud : मांत्रिकाकडून दांपत्याची १४ कोटींची फसवणूक; इंग्लंडमधील घरासह सर्व संपत्ती विकण्यास भाग पाडले

Pali Public Protest : पाली नगरपंचायतच्या जुलमी करवाढीविरोधात संतप्त नागरिकांचा एल्गार; नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव देणारे निवेदन!

SCROLL FOR NEXT