मुंबई

देशात एकही महिला अशिक्षित राहू नये

CD

देशात एकही महिला अशिक्षित राहू नये
डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांचे प्रतिपादन

मुंबई, ता. २५ : ‘देशात येत्या २५ वर्षांत आपण अमृतकाल साजरा करू, त्या वेळी आपल्या देशातील एकही महिला अशिक्षित राहणार नाही. प्रत्येक महिलेला हवे ते उच्च शिक्षण देता यावे, यासाठी आपली आणि एसएनडीटी विद्यापीठाचीही क्षमता वाढावी, असे आपण स्वप्न पाहू या,’ असे प्रतिपादन एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले.
विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात अध्यक्षीय भाषणादरम्यान त्या असे म्हणाल्या. यावेळी अध्यासनाचे प्रमुख डॉ. संजय शेडमाके, विद्यापीठ कर्मचारी परिषदेचे पदाधिकारी, प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. चक्रदेव पुढे म्हणाल्या, ‘महात्मा फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी समाज बदलायला हवा हे जाणले. त्यासाठी प्रत्येकाने विविध मार्ग स्वीकारले. त्यात महिला केंद्रबिंदू आहे. भगवद्‌गीतेतील दहाव्या अध्यायातील ३४व्या श्लोकातील तिसऱ्या ओळीत भगवान श्रीकृष्णाने महिलांसाठी सात गुण सांगितलेले आहेत. हे सात गुण आपण जाणले नाहीत तर आपण आपले अधिकार जाणू शकत नाही. त्यामुळे आपले महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे.’
...
सबलीकरण शिक्षणातून घडते!
महिलांच्या सबलीकरणासंदर्भात कुलगुरू डॉ. चक्रदेव म्हणाल्या, सबलीकरण हे आतून येते. ते शिक्षणातून घडते. शिक्षणातून महिलांचे सबलीकरण हाच विद्यापीठाचा उद्देश आहे. यासाठी सगळ्यांनी एकमेकांचे हात पकडून सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT