मुंबई

चांदिवली रुग्णालय दोन वर्षात रुग्णसेवेत

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : चांदिवली, संघर्ष नगर येथील रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर सुरू असून हे रुग्णालय जून २०२६ पर्यंत रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. सुमारे २५० बेड असलेल्या या रुग्णालयात चाचण्यांसह विविध आजारांवर स्वस्त दरात उपचार होणार आहेत. त्यामुळे याचा फायदा चांदिवली, पवई, साकीनाका असल्फा, अंधेरी-कुर्ला रोड येथील नागरिकांना होणार आहे.
मुंबई महापालिकेने आपली आरोग्य सेवा सक्षम करण्यावर विशेष भर दिला आहे. यासाठी उपनगरीय रुग्णालयाचा विस्तार व नवीन रुग्णालये उभारली जात आहे. महापालिकेची केईएम, नायर, सायन आणि कुपर ही प्रमुख रुग्णालय असून १६ विशेष व चार संसर्गजन्य आजाराची रुग्णालये आहेत. त्याशिवाय प्रसूतीगृह व आरोग्य केंद्र दवाखाने आहेत. तरीही रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेकांना उपचार मिळण्यास विलंब होत आहेत. त्यामुळे वांद्रे भाभासह राजावाडी, भगवती व अन्य उपनगरीय रुग्णालयाचा विस्तार तर उपनगरीय रुग्णालयाची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार चांदिवलीत रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
चांदिवली संघर्ष नगर येथे तब्बल ३२२ कोटी रुपये खर्च करून २५० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्यामुळे, या भागातील नागरिकांना आता राजावाडी आणि पालिकेच्या अन्य रुग्णालयावर अवलंबून राहावे लागणार नाही. सध्या या रुग्णालयाचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जून २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 
...
अद्यावत सुविधांचा समावेश
चांदिवली रुग्णालयात बाह्य रुग्णसेवेसह अपघात विभाग, आयसीयू व अन्य वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध असणार आहे. त्याशिवाय क्रोनिक डायलिसीस, ॲन्डोस्कोपी, हेमॅटॉलॉजी, युरोलॉजी, कॅथलॅब, एमआरआय, सीटीस्कॅन, एक्स-रे सुविधा सुरू करण्यात येणार आहे. बालरोग, पोटविकार, मज्जातंतू (न्यूरोलॉजी) अशा शस्त्रक्रियांसह वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT