मुंबई

गोलाकार रोबोटसाठी सामंजस्य करार

CD

गोलाकार रोबोटसाठी सामंजस्य करार

मुंबई, ता. २९ ः गोलाकार‍ प्रकारचे रोबोट आणि त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आदींची देवाणघेवाण करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि अलिबी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली.
यावेळी आयआयटीच्या आर अँड टीचे अधिष्ठाता प्रा. सचिन पटवर्धन आणि अलिबी ग्लोबलचे संचालन संचालक डॉ. एस. पी. सुनील यांनी या करारावर स्वाक्षरी केली. गोलाकर रोबोट हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही अत्यंत प्रभावीपणे कार्यरत असतो. हा कॉम्पॅक्ट, टेली-ऑपरेटेड रोबोट, अंदाजे हँडबॉलच्या आकाराचा, त्याच्या ऑपरेटरना रिअल-टाइम पॅनोरॅमिक व्हिज्युअल फिडबॅक प्रदान करून, अवघड भूप्रदेशांमध्ये सहजतेने तैनात केले जाऊ शकते. यामुळे देशभरातील सुरक्षा दलांच्या सामरिक क्षमता वाढवण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होईल, असा विश्वास आयआयटीकडून व्यक्त करण्यात आला. अलिबी हिसायबर इंटेलिजन्स आणि डिजिटल फॉरेन्सिक स्टार्टअप कंपनी, भारताच्या संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी क्षेत्रात तीन वर्षांपासून सक्रिय योगदान देत आहे आणि भारतीय नवकल्पना आणण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे, असे कंपनीचे संचालक श्याम के. एम. यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT