मुंबई

तापमानाची धग कायम

CD

तापमानाची धग कायम
कर्जतमध्ये ४४.१ अंशांवर, उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : एमएमआर परिसरातील तापमानाची धग सोमवारीही कायम राहिली. कर्जतमध्ये सर्वाधिक ४४.१ अंश कमाल तापमान नोंदवले गेले. ठाणे ४१.२, धसई ४२.४, नवी मुंबई ४१.१, पालघर ४१, विरार ४०.५ आणि अलिबाग येथे ३५.२ कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबई शहर आणि उपनगरातील तापमानात एका अंशाची वाढ होऊन ते चाळिशीच्या आणखी जवळ पोहोचले. आर्द्रतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने उन्हाची तीव्रता तितकीशी जाणवत नव्‍हती. दरम्यान, शहर आणि उपनगरातील उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने कायम ठेवला आहे.
सांताक्रूझमध्ये कमाल ३९.१ आणि किमान २७, तर कुलाबा येथे कमाल ३५.२ आणि किमान २५ अंश तापमानाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत कमाल तापमानात साधारणत: एक अंशाने वाढ झाली आहे. हवामान खात्याने मुंबईतील तापमानात साधारणता ३० एप्रिलपर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
मंगळवारी शहर आणि उपनगरात आकाश मुख्यता निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३८ आणि २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात काही अंशी घट होण्याचा अंदाज आहे.
----
मुंबईत आर्द्रता घटली
शहरातील आर्द्रतेत कमालीची घट झाली आहे. कालच्या ५२ टक्क्यांच्या तुलनेत बोरिवलीची आर्द्रता ३२ टक्के आहे. सांताक्रूझ येथील आर्द्रता ४० टक्क्यांच्या खाली, ठाणे ३० टक्क्यांच्या खाली आहे. उष्णतेची कोरडी लाट दिसली. १५-१७ एप्रिलला आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या तुलनेत या वेळी हवामान जास्त दमट जाणवले नाही. यामुळे लोकांना याचा फारसा त्रास झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

SCROLL FOR NEXT