मुंबई

परराज्यातील मराठी बोलींचे सर्वेक्षण

CD

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : व्यापार, व्यवसाय आदी अनेक कारणांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या मराठी भाषिकांची बोली, त्या बोलींचेी वैशिष्ट्ये, तिच्या त्या-त्या राज्यातील स्थानिक भाषांचा झालेला प्रभाव या बाबींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. राज्य मराठी भाषा विकास संस्थेने ‘मराठीच्या बोली : एक भाषा वैज्ञानिक अभ्यास’ या नावाने एक प्रकल्प तयार केला असून याबाबतचा करारही काही काही संस्थांसोबत करण्यात आला आहे.
देशभरात प्रामुख्याने तमिळनाडूतील आरणी शहर, कर्नाटकातील म्हैसूर, गुजरातमधील बडोदा, मध्य प्रदेशातील भोपाळ देवास आणि उत्तर प्रदेशातील बिठूर या शहरांमध्ये असलेल्या मराठी बांधवांच्या बोलींचे हे सर्वेक्षण केले जाणार आहे. प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर यात काही शहर आणि परिसरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून एकाच काळात देशाच्या निरनिराळ्या भागांत विखुरलेल्या मराठी भाषिकांच्या मराठी बोलींचा तौलनिक अभ्यास केला जाणार आहे. यासाठी त्या-त्या राज्यात भाषिक केंद्रांची निवड केली जाईल. यात कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यातील मराठी भाषिकांचा द्रविड भाषेच्या संपर्कात आलेली केंद्र आणि उत्तर भारतातील हिंदीसह गुजराती भाषांच्या संपर्कातील केंद्र निवडून त्याचे सर्वेक्षण केले जाईल. परराज्यातील मराठी भाषिकांच्या बोलींचे अशा प्रकारचे हे पहिलेच सर्वेक्षण आहे.
------------------------
संकलनासाठी चार महिन्यांचा कालावधी
सर्वेक्षणासाठी निवडण्यात येणाऱ्या विविध शहरांतील तीन मुख्य जाती समूहातील प्रत्येकी पाच भाषेत मुलाखती घेतल्या जातील. या व्यक्तींची निवड करताना वय वर्षे १५ ते ३०, ३१ ते ५० आणि ५१ वर्षांपुढील अशा तीन वयोगटातील स्त्री-पुरुष अशा एकूण १५-२० भाषकांकडून भाषिक सामग्री संकलित केली जाईल. सामग्री संकलनाकरिता अंदाजे चार ते पाच आठवडे इतका कालावधी घेतला जाईल.
--------------------------------------
डिजिटल स्वरूपात मिळणार माहिती
देशभरात संकलित सामग्रीचे शब्दस्तरीय, व्याकरणिक विश्लेषण तसेच विश्लेषणाची संपर्क भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी केली जाईल, या प्रकल्पाला सुमारे नऊ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या राज्यांतील मराठी बोलींचा ध्वनी, शब्द, वाक्य आणि पाठ अशा विविध भाषिक स्तरांवरांवरील अभ्यास केला जाणार आहे.
-----------------------------------------------------
असे असेल सर्वेक्षण
- महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या राज्यातील प्रत्यारोपित मराठी बोलींचा सर्व भाषिकस्तरांवर अभ्यास केला जाईल.
- सर्वेक्षणासाठी आधुनिक भाषावैज्ञानिक दृष्टीने एकसमान पद्धतीचा अवलंब केला जाईल.
- क्षेत्रपाहणी, भाषावैज्ञानिक विश्लेषण, सादरीकरणासाठी समान पद्धतीचा अवलंब होईल.
- ध्वनी, शब्द, वाक्य आणि पाठ या सर्व भाषिकस्तरांवर भाषा सामग्रीचे संकलन आणि विश्लेषण केले जाईल.
-----------------------------------
देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या मराठी भाषिकांची बोलीचा हा भाषिक सामग्रीचा तौलनिक अभ्यास डिजिटल स्वरूपात असणार आहे. प्रकल्पाची माहिती अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- डॉ. शामकांत देवरे, संचालक, राज्य मराठी विकास संस्थेचे (अ.का.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT