मुंबई

महाराष्ट्र दिनी मतदारांसाठी विशेष उपक्रम

CD

मराठी मुस्लिम संघ, महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : संविधान आणि देशाच्या एकात्मता आणि अखंडतेसाठी इंडिया आघाडीच्या बाजूने उभे राहणे महत्त्वाचे आहे. एनडीए सरकारने त्यांच्या १० वर्षांच्या कालखंडात मुस्लिमविरोधी अनेक निर्णयदेखील घेतले आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड नाराजी आहे. या कारणामुळेच या निवडणुकीत इंडिया आघाडीला मतदान करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष एफ. एम. ठाकूर यांनी सांगितले.

मराठी मुस्लिम सेवा संघाने पत्रक काढून आपली भूमिका जाहीर केली आहे. एनडीए सरकारने शरियतमध्ये ढवळाढवळ केली आहे. मुस्लिमांवर समान नागरी कायदा लादण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी मदरसे रद्द करण्याचा विचार सुरू असून एनडीए सरकार वक्फच्या विरोधात असल्याची भावना मुस्लिमांची झाली असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मुस्लिमांवर सीएए आणि एनआरसी लादण्याची भीती घालण्यात येत आहे. १७ लाख मुस्लिम विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा घाट घातला जात आहे. तसेच बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांची सुटका केल्यामुळेही मुस्लिमांची नाराजी असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.

मराठी मुस्लिम सेवा संघाने आपल्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून मुस्लिम वस्त्यांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही मुस्लिम समाजाला पत्रक काढून विनंती केली आहे की, या लोकसभा निवडणुकीत इंडिया महाआघाडीला मत देऊन यशस्वी करण्याचे आवाहनही ठाकूर यांनी केले.
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Controvarsy: फुल राडा... अंगकृश रघुवंशीच्या विकेटने वातावरण पेटले! अम्पायरने त्याला ढकलले, अभिषेक नायर भांडला Video

धडा वेगळे शीर करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; अघोरी पूजेतून नरबळी असल्याची शंका

रॅडिसनची मोठी भरारी! २०३० पर्यंत भारतात ५०० हॉटेल्सचं लक्ष्य; ८० हजार तरुणांना मिळणार रोजगाराची सुवर्णसंधी

मुंबई उच्च न्यायालय भरतीत मोठा वाद! ‘राष्ट्रभाषा’ प्रश्नावरून संताप उसळला; मराठी एकीकरण समिती आक्रमक

Child Marriage : मोहळाईत 16 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला; 112 हेल्पलाईन व पारध पोलिसांच्या तत्पर कारवाईने अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT