मुंबई

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत सर्वेक्षण

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रॅगिंग, अभ्यासाचा ताण, घरापासून दूर राहणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत वैद्यकीय विद्यार्थ्यांचे रॅगिंग रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाने वेळोवेळी महत्त्वाची पावले उचलली आहेत. याच क्रमाने आयोगाने आता विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे रॅगिंग रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अनेक प्रयत्न करत आहे. यासाठी आयोगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अँटी रॅगिंग सेलची स्थापना केली आहे. अँटी रॅगिंग सेलने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जाणून घेण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत अँटी रॅगिंग सेलने यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाच्या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांचे तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ऑनलाइन मानसिक आरोग्य सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थी आणि प्राध्यापकांची ओळख आणि त्यांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

अहवाल तयार करण्यासाठीच सर्वेक्षण
नॅशनल मेडिकल कमिशनने स्पष्ट केले आहे की, सर्वेक्षणात मिळालेली माहिती केवळ विश्लेषण आणि अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक शिफारशींसाठी वापरली जाईल. ऑनलाइन सर्वेक्षण करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाने गुगल लिंक तयार केली आहे. ही लिंक देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना पाठवली जाईल. याशिवाय आयोगाच्या वेबसाइटवरही ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी ३ मे २०२४ पर्यंत या सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे नॅशनल मेडिकल कमिशनने सुचवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result live update : पन्हाळा, हातकणंगलेत विनय कोरेंना धक्का देत सतेज पाटलांची एकतर्फी बॅटिंग; महायुतीचे उमेदवार ४० मतांच्या फरकांनी आघाडीवर

Priest Dies Viral Video : चर्चमध्ये प्रार्थना सुरू असतानाच कोसळला भलामोठा क्रूस; दुर्दैवी घटनेत धर्मगुरूंचा मृत्यू, थरारक VIDEO VIRAL

Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, सूरत एक्सप्रेसमधून तिघेजण ताब्यात; महत्त्वाची माहिती समोर

PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार? पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर; 'या' महिन्यात खात्यात येणार पैसे, घरबसल्या असे तपासा स्टेटस

Latest Marathi News Live Update : अरुण डोंगळे प्रचंड मतांनी पिछाडीवर; सतेज पाटील यांच्या 'समविचारी'चे सहा उमेदवार आघाडीवर

SCROLL FOR NEXT