

Tiger Shroff Firing Case
ESakal
मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर रविवारी (ता. १८) सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या अनोळखी आरोपींनी गोळीबार केल्याची घटना जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात घडली. या हल्ल्यातून टायगर श्रॉफ सुखरूप बचावला असून, त्याचा वाहनचालक आणि एक पादचारी जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून आरोपींना पकडण्यासाठी काही पथकेही तयार करण्यात आली. यादरम्यानच मुंबई पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.