मुंबई

घाटकोपरमध्ये सोन्याची बिस्किटे सापडल्याची अफवा

CD

घाटकोपरमध्ये सोन्याची बिस्किटे सापडल्याची अफवा


मुंबई, ता. ११ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी विविध ठिकाणी पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीदरम्यान घाटकोपर येथे एसएसटी निरीक्षण पथकाने एका वाहनाची तपासणी केली. यामध्ये प्रचारसाहित्याचे बॉक्स होते. त्याची तपासणी करताना प्रचारसाहित्यासोबत सोन्याचे बिस्कीट असल्याचे ध्वनिचित्रफित सोशल मीडियावर प्रसारित झाले आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी आणि संबंधित पथकाने बॉक्स तपासले असता त्यात प्रचारसाहित्य वगळता काहीही आढळून आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. या तपासणीवेळी तेथे उपस्थितांनी वेगळा उल्लेख केल्याने हा प्रकार व्हायरल केला गेला असल्याचे आढळून आले. मात्र, यामध्ये कोणत्याही बाबींची सत्यता पडताळूनच वापरकर्त्यांनी सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषत: निवडणूक काळात कोणत्याही बाबींची खातरजमा झाल्याशिवाय आणि त्याची सत्यता पटल्याशिवाय सोशल मीडियावर अशाप्रकारे ध्वनिचित्रफित अथवा कोणताही मजकूर कोणीही शेअर करू नये अथवा फॉरवर्ड करण्यात येऊ नये, असे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले. यासंदर्भात उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास सायबर सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक प्रशासनाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT