मुंबई

राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट

CD

राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट


९१ जणांमध्ये फ्लर्ट केपी.२ सब व्हेरिएंटचे निदान

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : कोविड केपी. २ (फ्लर्ट) चा नवीन उपप्रकार महाराष्ट्रात आढळून आला आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ९० कोविड पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये या नवीन उपप्रकाराचे निदान झाले आहे. त्यामुळे जे रुग्ण आधीच इतर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोविडच्या ओमिक्रॉन प्रकाराचे जे.एन. १ उपप्रकार आता केपी.२ मध्ये बदलला आहे. याला फ्लर्ट प्रकारदेखील म्हटले जाते. जे.एन. १ व्हेरिएंटनंतर, केपी. २चा अमेरिकेत अधिक प्रभाव दिसून आला. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ९१ जणांमध्ये नवीन उपप्रकाराचे निदान झाले असून त्यात पुण्यातील ५१, ठाणे २०, अमरावती ७, छत्रपती संभाजीनगर ७, सोलापूर, अहमदनगरमधील २ रुग्णांचा समावेश आहे. लातूर, नाशिक आणि सांगलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. नवीन सब-व्हेरिएंटचे एकही प्रकरण मुंबईत आढळून आलेले नाही. शुक्रवारी राज्यात ८ नवीन कोविड रुग्ण आढळून आले. त्यात मुंबईतील ४, ठाण्यात १, पनवेलमध्ये १, सांगलीत १ आणि छत्रपती संभाजीनगरमधील १ रुग्ण आढळून आला.


जे. एन.१ प्रकारातील उत्परिवर्तनानंतर केपी २ उपप्रकार तयार झाला आहे. कोविड विषाणूशी लढण्यासाठी आपले शरीर जसजसे मजबूत होत आहे, तसतसे विषाणूदेखील उत्परिवर्तन करत आहे आणि त्याचे अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हे ओमिक्रॉनचे उप-प्रकार आहे, त्यामुळे त्याची वैशिष्ट्येदेखील ओमिक्रॉनसारखीच आहेत. त्याचा प्रसार झपाट्याने होतो. जे लोक आधीच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
- प्रा. डॉ. राजेश कार्यकर्ते, सदस्य, महाराष्ट्र टास्क फोर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

शेतकरी दुष्काळाने होरपळतोय, नेते खातायत सुकामेवा, आढावा बैठकीत काजू बदामचा नाश्ता

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

SCROLL FOR NEXT