मुंबई

दहावी-बारावीत मुलींचीच सरशी

CD

मुंबई, ता. १३ : ‘आयसीएसई’च्या निकालानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज (ता. १३) (सीबीएसई) दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. दहावीचा ९३.६० टक्के निकाल, तर बारावीचा ८७.९८ टक्के निकाल लागला आहे. दोन्ही परीक्षांच्या निकालात मुलीच मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत. दहावीत ९४.७५ टक्के, तर बारावीत ९१.९२ टक्के मुलींनी यश मिळवले आहे.
महाराष्ट्राच्या दहावीच्या निकालात मागील वर्षांच्या तुलनेत किंचित घसरण झाली आहे, तर बारावीचा निकाल २.६६ टक्के वाढला आहे.

महाराष्ट्रातील बारावीला ३२ हजार ३४६ विद्यार्थ्यांपैकी २९,०३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८९.७७ टक्के निकाल लागला आहे; तर दहावीच्या एक लाख सात हजार ६५५ पैकी एक लाख तीन हजार ९१६ विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. एकूण निकाल ९६.५३ टक्के लागला आहे. दहावीतील दोन लाख १२ हजार ३८४ विद्यार्थ्यांना ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असल्याने मुंबईसह देशभरातील कनिष्ठ महविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस वाढणार आहे. बारावीतही एक लाख १६ हजार १४५ विद्यार्थ्यांना ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
देशभरात ‘सीबीएसई’चा सर्वाधिक निकाल हा त्रिवेंद्रम विभागाचा लागला आहे. या विभागाचा बारावीचा निकाल ९९.९१ टक्के, तर दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. मुंबईचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा दहावीचा निकाल ९६.४६ टक्के असून देशभरात पुणे विभाग सहाव्या स्थानी आहे. बारावीचा पुणे विभागाचा निकाल ८९.७८ टक्के असून देशभरात पुणे नवव्या स्थानी आहे. सर्वात कमी निकाल गुवाहाटी (दहावी) ७७.९४ टक्के आणि प्रयागराज (बारावी) ७८.२५ टक्के इतका लागला आहे.
----
गुणवत्ता यादी नाही!
यंदाही सीबीएसई बोर्डाने गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही, तसेच प्रथम तीन क्रमांकांवरील विद्यार्थ्यांना बोर्डाकडून पारितोषिकेही देण्यात येणार नाहीत. विषयनिहाय सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र दिली जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
-------
दहावीचे विद्यार्थी
एकूण : २२,३८,८२७
उत्तीर्ण : २० लाख ९५ हजार ४६७
टक्केवारी : ९३.६०
----
बारावीचे विद्यार्थी
एकूण : १६,२१,२२४
उत्तीर्ण : १४,२६,४२०
टक्केवारी : ८७.९८
-----
दहावी
ुमुली : ९४.७५ टक्के
मुले : ९२.७१ टक्के
ट्रान्सजेंडर : ९१.३० टक्के
---
बारावी
मुली : ९१.५२ टक्के
मुले : ८५.१२ टक्के
ट्रान्सजेंडर : ५० टक्के
--
निकालाची वैशिष्ट्ये
- ४७,९८३ : दहावीच्या विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण
२४,०६८ : बारावीच्या विद्यार्थ्यांना ९५ व त्यापेक्षा जास्त गुण आहेत.
- बारावीच्या ७१ विषयांचा निकाल १०० टक्के
--
महाराष्ट्राचा निकाल
बारावी
परीक्षेला बसलेले विद्यार्थी : ३२,३४६
उत्तीर्ण विद्यार्थी- २९,०३६
एकूण निकाल - ८९.७७
--
दहावी
परीक्षेला बसलेले विद्यार्थी :१,०७,६५५
उत्तीर्ण विद्यार्थी : १,०३,९१६
एकूण निकाल : ९६.५३
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: २ महिन्यांत सत्तेचा मोठा उलटफेर? उपमुख्यमंत्री थेट मुख्यमंत्री होणार अशी भविष्यवाणी, पडद्यामागे काय सुरू आहे?

Latest Marathi News Live Update: मेस्सी आणि सुनील छेत्री वानखेडेवर भेटले

'लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली ऊसतोडणी'; यंदा २५ ऊस हार्वेस्टरला साहाय्य, शेतकऱ्यांशी साधला संवाद

Solapur News: सोलापुरात दुहेरी उत्सव! महापालिका निवडणूक व सिद्धेश्वर यात्रा एकत्र साजरी होणार

Prakash Parab Passes Away: 'सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी प्रकाश परब यांचे निधन'; शिक्षण क्षेत्रातून हाेतेय हळहळ व्यक्त..

SCROLL FOR NEXT