मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीतर्फे टीव्हीएस आयक्यूबच्या नवीन इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आणल्या आहेत. त्या सीरिजची किंमत (एक्स शोरूम) ९४ हजार ९९९ पासून सुरू होईल. यातील बॅटरी पॅक या क्षेत्रातील सर्वांत मोठा असून, वाहन सुरक्षा, सुलभ वापर, चार्जिंग सुविधा ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. या दिवसाची ८० टक्के चार्जिंग दोन तासांत होते, अशी माहिती टीव्हीएस मोटरच्या इलेक्ट्रिक व्हेईकल विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सक्सेना यांनी दिली. टीव्हीएस आयक्यूब (२.२ केडब्ल्यूएच), टीव्हीएस आयक्यूब (३.४ केडब्ल्यूएच), टीव्हीएस आयक्यूब (३.४ केडब्ल्यूएच), टीव्हीएस आयक्यूब एसटी (३.४ केडब्ल्यूएच), टीव्हीएस आयक्यूब एसटी (५.१ केडब्ल्यूएच) ही संपूर्ण टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक सीरीज भारतातल्या ४३४ शहरांतील कंपनीच्या दालनांमध्ये उपलब्ध होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.