मुंबई

अनुभवाधारीत शिक्षणासाठी ऑन जॉब ट्रेनिंग प्रभावी माध्यम

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत ऑन जॉब ट्रेनिंग देण्यात आले. प्रत्यक्ष व अनुभवाधारित मिळालेल्या शिक्षणातून कौशल्यवृद्धी झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण हे प्रभावी असल्याचे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि ज्ञानस्रोत केंद्र मुंबई विद्यापीठ येथे ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. यात विद्यार्थ्यांना क्युरेटर, गाईड, संग्रहालय प्रदर्शनाचे आयोजन, कागदपत्रे जतन व संवर्धनाचे तांत्रिक ज्ञान, संग्रहालय व संग्रह व्यवस्थापन, वारसा संवर्धन, अभ्यागत सर्वेक्षण, जर्नल प्रकाशन, ग्रंथालयातील कामे, कंटेन्ट तयार करणे, समाज माध्यमांसाठी आशय तयार करणे आदी प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश होता.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात समाज माध्यम विभागासाठी काम करणाऱ्या प्रचेता हजारिका या विद्यार्थिनीने समाजमाध्यमांचे तंत्रज्ञान, विपणन व्यवस्थेचे कौशल्य आणि आशय अशा विषयाच्या अनुभवाधारित शिक्षण मिळाले असल्याचे सांगितले. अल्फाबेटिकल कॅटलॉग, डिजिटल कॅटलॉग, क्लासिफिकेशन, रजिस्टर्ड डिटेल्स असे विषय प्रत्यक्षरीत्या शिकायला मिळाल्याचे सोनिया गुप्ता या विद्यार्थिनीने तिच्या ग्रंथालयातील कार्यानुभव सांगितला. संग्रहालय प्रदर्शनी आयोजन, प्रकाश आणि रंगव्यवस्थेचे परिणाम असे कौशल्य प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले असल्याचे कृष्णा जवेरी या विद्यार्थ्याने सांगितले. अभ्यागत सर्वेक्षणांतर्गत पर्यटक, विद्यार्थी, सर्वसामान्य लोक यांच्याकडून माहितीचे संकलन करून अहवाल तयार करण्याचा अनुभव निश्चय सुर्वे यांनी सांगितला. संग्रहालयातील आर्टिफेक्ट्स, स्कल्प्चर्स आणि विविध गॅलेरींना भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसोबत साधलेला संवाद हा समृद्ध करणारा असल्याचे शॅनन फर्नांडिसने सांगितले. त्याचबरोबर बॉम्बे नेच्युरल हिस्ट्री सोसायटी येथे कार्यांतर्गत प्रशिक्षणादरम्यान प्रकाशन आणि संग्रह विभागात काम करताना साहित्य, जर्नल्स, कागदपत्रे जतन आणि संवर्धनाबरोबरच तांत्रिक ज्ञानाची भर पडली असल्याचे विध्या आदिद्रविदरने सांगितले. डेटा नेव्हिगेटिंग, सॉफ्टवेअर स्कील्स, डेटा एन्ट्री आणि सॉर्टिंग अशी तांत्रिक कौशल्ये आत्मसात करायला मदत झाली असल्याचे आर. इमसाँग यांनी सांगितले. तसेच ज्ञानस्रोत केंद्र मुंबई विद्यापीठात बुककिपिंग, क्लासिफाईंग अँड लेबलिंग बुक्स अँड अदर डेटा, लायब्ररी डेटाबेस अशा अनुषंगिक बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले असल्याचे मंजित कौरने सांगितले.
…..
कार्यांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य आहे. या अनुषंगाने इतिहास विभागाने पुढाकार घेऊन विविध संस्थेत विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली असून पुढेही अनेक संस्थामध्ये विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंगसाठी पाठविले जाणार असल्याचे विभागप्रमुख प्रा. संदेश वाघ यांनी सांगितले.

--
विद्यार्थ्यांना शिकतानाच उदयोन्मुख क्षेत्रातील गरजा व संधी यानुसार प्रात्यक्षिक ज्ञान, अनुभव, कौशल्य आणि प्रशिक्षण उपलब्ध व्हावेत, यासाठी कार्यांतर्गत प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) ची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण अनिवार्य आहे. यासाठी विद्यापीठातील विविध विभागांनी पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT