मुंबई

घरातनच डेंगीचा फैलाव

CD

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईकरांच्या घरातच डेंगीचा फैलाव होत आहे. डेंगीचे डासांचा झोपडपट्टी आणि गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात प्रादुर्भाव वाढला आहे. पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, कीटकनाशक विभागाच्या तपासणीत दररोज ३४५ डेंगी डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळून आली आहेत.
डेंगी हा आजार एडिस इजिप्ती डासाच्या चावण्याने होतो. स्वच्छ पाण्यात या डासांची पैदास होते. गेल्या वर्षी डेंगीच्या डासांनी मुंबईकरांना खूप त्रास दिला होता. २०२३ मध्ये मुंबईत डेंगीचे विक्रमी पाच हजार ४८६ रुग्ण आढळले. यावर्षी १४ मेपर्यंत २९६ जणांना डेंगीची लागण झाली आहे. त्यामुळे कीटकनाशक विभागाकडून डासांमुळे होणारे आजार टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते १४ मे या कालावधीत कीटकनाशक विभागाने घरोघरी जाऊन ३५,९४० डेंगी डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट केली. गेल्या वर्षी डेंगी डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण शोधून १,३१,९८० नष्ट करण्यात आली होती.
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, डासांना प्रतिबंध आणि डासांमुळे होणारे आजार झाल्यानंतर उपचारासाठी विविध उपाययोजना आखल्या जातात. याशिवाय, लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रमही आयोजित केले जातात. मान्सूनचे आगमन होणार आहे. मुंबईकरांनी आपल्या आवारातील पाण्यात डासांची पैदास होऊ देऊ नये. स्वच्छ पाणी झाकून ठेवा. जेणेकरून त्यात डासांची उत्पत्ती होणार नाही.
….
झोपडपट्टी आणि सोसायटीमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी डासांची १,३१,९८० उत्पत्ती स्थळे सापडली होती. त्यापैकी सुमारे ९९ हजार ठिकाणे झोपडपट्ट्यांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये आढळली होती. पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोसायटी आणि झोपडपट्ट्यांमध्ये उत्पत्तीस्थळे सापडत आहेत. त्यामुळे तपासणी मोहीम राबवली जात आहे. झोपडपट्टीत ठेवलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये ७९ हजार ठिकाणी ही उत्पत्तीस्थळे सापडली आहेत.
…...
आतापर्यंतची कारवाई
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी मार्चपर्यंत ५,२२४ उत्पत्तीस्थळे आढळली आहेत. याबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच १७९ जणांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. तर गेल्यावर्षी २२ हजार ५७१ नोटिसा देण्यात आल्या असून दोन हजार २३० न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT