rain  sakal
मुंबई

Rain News: मुंबईकरांनो लक्ष द्या, मे अखेरीस मान्सून पूर्व पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Mumbai rain Date तापमानाचा पारा वाढणार असून पुढील काही दिवस मुंबईकरांसाठी उष्ण, दमट आणि अस्वस्थ करणारे आहेत. मेअखेरीस पावसाचे पुनरागमन होत असून त्याचाच हा परिणाम असल्याचे हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले. यामुळे मुंबईमध्ये प्री-मान्सून सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


मंगळवारी (ता. २१) सांताक्रूझ येथे ३४.९; तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली; तर आर्द्रता सुमारे ६५ ते ७० टक्क्यांच्या आसपास नोंदवली गेली. यामुळे मुंबईत सध्या दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. पुढील आठवड्यात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्या सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार व संध्याकाळपर्यंत आकाश निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ अंश सेल्सिअस आणि २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Kothrud fraud Case : कोथरूडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने भागीदाराला अडीच कोटींचा गंडा; आर. के. लाईफस्पेस डेव्हलपर्सवर गुन्हा

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

'ही कास्टिंग पटलच नाही!' वरुण धवनच्या चित्रपटात १ वर्षांनी मोठी अभिनेत्री बनली त्याची आई, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT