मुंबई

मलनिस्सारण वाहिन्या तुडुंब

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : पावसाळा तोंडावर आल्याने आता नालेसफाईच्या कामांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नालेसफाईचे काम वेळेत होत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला असला तरी नालेसफाईबाबत अनेक तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. तसेच शहरात अनेक ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्यांमधील सांडपाणी रस्त्यांवर येत आहे. यामुळे पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आनंद नगरमध्ये एका आठवड्यापासून मुख्य रस्त्यावरील बँक ऑफ बडोदाच्या समोरच्या बाजूला मलनिस्सारण वाहिनीचे मुख्य चेंबर चोकप झाले असून त्यातून सांडपाणी परिसरात बाहेर वाहत आहे. त्याचा त्रास पादचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांना होत आहे. तसेच दरवर्षी पावसाळ्यात आनंद नगर परिसर जलमय होत असतो. येथे कंबरेपर्यंत पाणी साचते. यामुळे येथील वसाहतींतील इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानदार आणि राहणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे आनंद नगर परिसरातील मुख्य रस्त्यावरच्या आणि मेट्रोस्थानकांजवळील मलनिस्सारण वाहिन्यांची तातडीने सफाई करण्याची गरज आहे, अन्यथा आनंद नगर आणि उड्डाण पुलाच्या आसपासच्या इमारतींत पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
काम न झाल्यास स्थानिक रहिवासी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता राजेश पंड्या यांनी दिली आहे.

अधिकृत आकडे जाहीर करा
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीदेखील नालेसफाईवरून पालिका प्रशानावर टीका केली आहे. मुंबईत नालेसफाईची कामे नक्की किती झाली आहेत, याबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती महापालिका प्रशासनाने दिलेली नाही. तसे पाहिले तर आतापर्यंत फक्त ४५ ते ५० टक्के कामे झाली आहेत. मान्सून अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे, अशा परिस्थितीत ही कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासकांनी नालेसफाईची अधिकृत आकडेवारी जाहीर करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT