मुंबई

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून

CD

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून
पहिल्या टप्प्याची नोंदणी सुरू; रिक्त जागांसाठी आधी नियोजन

आजपासून अकरावीच्या प्रवेशासाठी पहिल्या टप्प्याची नोंदणी
मुंबई, ता. २३ : मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला शुक्रवारी २४ मेपासून सुरुवात होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यासाठी नोंदणी करता येणार असून यासाठी मागील दोन दिवसांत विद्यार्थ्यांना सरावासाठी डमी लॉगीन उपलब्ध करून देण्यात आले होते, त्याला मुंबई महानगर क्षेत्रात मोठा प्रतिसादही मिळाला आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात मागील वर्षी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशासाठी २ हजार ३८५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ३ लाख ८९ हजार ६७५ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २ लाख ६७ हजार ८६२ जागांवर म्हणजेच केवळ ६९ टक्के प्रवेश झाले; तर उर्वरित १ लाख २१ हजार ८१३ जाग रिक्त राहिल्या होत्या. यंदा रिक्त राहिलेल्या जागांवर अधिकाधिक प्रवेश व्हावेत, यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा तीन नियमित फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या होणार आहेत; तर त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या आयोजित केल्या जाणार असून यात एफसीएफएस ही फेरी होणार नाहीत.
प्रवेशासाठी संकेतस्थळ
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शिक्षण मंडळाकडून
https://11thadmission.org.in/ या पोर्टलवर विद्यार्थ्यांना लॉगीन करून त्यावर आपली माहिती नोदविणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT