मुंबई

बी.एस्सीचा निकाल ३० दिवसाआधीच जाहीर

CD

बी. एस्सीचा निकाल जाहीर
२,०९८ विद्यार्थी उत्तीर्ण; ३० दिवसांच्या आत प्रक्रिया

मुंबई, ता. २३ : मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी. एस्सी सत्र सहाचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत २,०९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.५४ एवढी आहे. विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या निकालाबरोबरच विज्ञान शाखेचा निकालही ३० दिवसांच्या आत जाहीर केला आहे.
या परीक्षेत ८,२६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ७,९४७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये २,०९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ३,५९१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल ३७.५४ टक्के एवढा लागला असून ३२१ विद्यार्थी अनुपस्थित होते. ४० विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवले आहेत, तर १,२५१ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने १,०६७ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून यामुळे एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवला नाही. मागील उन्हाळी सत्राच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक व बारकोड चुकीचे लिहिले होते, यामुळे त्यांचे निकालही राखीव राहिले होते, नंतर ते जाहीर झाले. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, बारकोड व इतर माहिती असलेली पीडीएफ फाईल प्रत्येक परीक्षा केंद्रांना पाठविलेली होती. त्यानंतरच्या क्यूआर कोड पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिले नाहीत.
..
संकेतस्थळावर उपलब्ध
विद्यापीठाने आजपर्यंत २०२४च्या उन्हाळी सत्राचे ५३ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षांचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT