मुंबई

दक्षिण मुंबईतील काही भागांत पाणीकपात

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मलबार हिल जलाशयाची अंतर्गत पाहणी रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या प्राध्‍यापकांमार्फत सोमवार (ता. ३ जून) आणि मंगळवारी (ता. ४ जून) करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मलबार हिल जलाशयाचा कप्पा क्रमांक एक आणि दोन टप्प्याटप्प्याने रिक्त करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे सोमवार ते मंगळवारी ए, सी, डी, जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांच्‍या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार आहे.

महानगरपालिकेकडून मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. मलबार हिल जलाशयाच्या कामाचे पुनर्विलोकन करण्यासाठी स्थापन केलेल्या आधीच्या विशेषज्ञ समितीने प्रस्तुत केलेल्या अहवालांचे विश्‍लेषण करण्यासाठी आणि मलबार टेकडी जलाशयातून मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा बाधित न करता जलाशयाच्या कामाची योग्य कार्यपद्धती सुचविण्याकरिता महापालिकेतर्फे रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्‍था (आयआयटी) या स्थापत्य अभियांत्रिकीतील मान्यताप्राप्त संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

मलबार हिल जलाशयाचा कप्पा क्रमांक एक आणि दोन टप्प्याटप्प्याने रिक्त करणे आवश्यक आहे. मलबार हिल जलाशयाची अंतर्गत पाहणी दोन दिवस केली जाणार आहे. या पाहणी कामकाजामुळे ए, सी, डी, जी उत्तर आणि जी दक्षिण विभागातील काही परिसरांतील पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे. या कामामुळे काही ठिकाणी पाण्‍याचा दाब कमी राहील. पाणीकपातीदरम्‍यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्‍यकता भासल्‍यास विभागवार पाण्‍याच्‍या वेळेत बदल करण्‍यात येईल. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

'पुष्पा 2 मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप' प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...'मला ते पाहून धक्काच बसला...'

SCROLL FOR NEXT