मुंबई

मुंबई कीटकनाशक व धूम्र फवारणी !

CD

मुंबईत कीटकनाशक व धूरफवारणी!
साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपला असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई शहर व उपनगरातील झोपडपट्टीसह नवीन इमारतीचे सुरू असलेले काम, मेट्रो व अन्य विकासकामे तसेच शहराच्या अन्य भागात कीटकनाशक व धूरफवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणी अडगळीत पडलेले भंगार जप्त करण्यात येणार आहे.
पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून साथीच्या आजाराला लगाम घालण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या जातात. या वेळी ही विशेष नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात कीटकनाशक व धूरफवारणी करण्यात येणार आहे. यासाठी खासगी संस्थांमार्फत विविध विभागांत कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या विविध भागांत कीटकनाशक फवारणी सुरू झाली असून जेथे मच्छरांचे प्रमाण जास्त आहे, तेथे धूरफवारणी करण्यात येत आहे. येथे १५ ते २० दिवस कीटकनाशक व धूरफवारणी केली जाणार आहे. रस्ते व गल्ल्यालगतची गटारे, चेंबर यामध्ये प्राधान्याने कीटकनाशक फवारणी करण्यात येणार आहे.
शहरात ठिकठिकाणी इमारतीच्या बांधकामांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन धूर व कीटकनाशक फवारणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय मेट्रोच्या कामांच्या ठिकाणीही धूम्र व कीटकनाशक फवारणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात इमारतींच्या बांधकामांच्या ठिकाणी भेट देऊन भंगारात पडलेले सामान जप्त करण्यात येणार आहे. त्याशिवाय पावसाळ्यात पाणी साठणार नाही, अशा वस्तू उघड्यावर ठेवू नयेत, असे आवाहनही करण्यात येणार आहे.

डेंगी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना-
डेंगी रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंगी विषाणूंचा प्रसार करणाऱ्या एडिस इजिप्टाय डासांची उत्पत्तिस्थाने आढळून आली होती. या डासांची उत्पत्ती साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होत असल्याचे सर्वेक्षणातूनही हे उघड झाले आहे. त्यामुळे घराशेजारील परिसरात असणारे टायर, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, पाण्याचे पिंप, मनी प्लांट व बांबू आदी शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, कुंड्यांखालील ताटल्या ठेवू नये, असे आवाहनही करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT