मुंबई

मलेरिया डेंगी मुक्त मुंबई करा

CD

मलेरिया, डेंगीमुक्त मुंबई करा
सुधाकर शिंदे ः ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंगी साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ॲक्शन प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. डेंगी, मलेरियामुक्त मुंबईसाठी सूक्ष्म उपाययोजना करत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात जून महिना ‘हिवताप (मलेरिया) विरोधी महिना’ म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ३ व ४ जून रोजी दोनदिवसीय विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. सुधाकर शिंदे बोलत होते.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामुदायिक औषधशास्त्र विभागप्रमुख, प्राध्यापक व सर्व २४ विभागांतील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून हिवताप निर्मूलनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
डॉ. रूप कुमारी यांनी हिवताप नियंत्रणासाठी १-३-७ धोरणाचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन केले; तर जागतिक आरोग्य संघटनेचे पथकप्रमुख डॉ. बद्री थापा यांनी हिवताप उद्रेकांचा तपास कसा करता येईल, त्यावर मत व्यक्त केले. डॉ. एन. आर. तुली यांनी दिल्लीत विविध उपाययोजना कशा प्रकारे राबविल्या जातात, ते सांगितले. दक्षा शहा यांनी सर्वांना सूक्ष्म योजना आखून काम करण्याचे आवाहन या वेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT